कारमधील संशयितांनी तरुणाचा आयफोन हिसकावला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:39 PM2018-07-21T16:39:58+5:302018-07-21T16:40:43+5:30

नाशिक : ‘फोनवर कोणाशी बोलतोय, चल दाखवं’ अशी धमकी देत इंडिका कारमधून आलेल्या दोघा संशयितांनी तरुणाचा आयफोन हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२०) दुपारी कॉलेजरोवर घडली़

nashik,car,two,suspects,mobile,snatching | कारमधील संशयितांनी तरुणाचा आयफोन हिसकावला 

कारमधील संशयितांनी तरुणाचा आयफोन हिसकावला 

Next
ठळक मुद्दे गंगापूर पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल

नाशिक : ‘फोनवर कोणाशी बोलतोय, चल दाखवं’ अशी धमकी देत इंडिका कारमधून आलेल्या दोघा संशयितांनी तरुणाचा आयफोन हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२०) दुपारी कॉलेजरोवर घडली़

पाथर्डी फाट्यावरील गजानननगरमध्ये अठरा वर्षीय यश संधान हा तरुण राहतो़ शुक्रवारी दुपारच्या सुमारास यश हा कॉलेज रोडवरील येवलेकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जात होता़ त्यावेळी एका पांढ-या रंगाच्या इंडिका कारमधून दोन संशयित आले़ त्यांनी यशच्या जवळ जात ‘फोनवर कोणाशी बोलतोय, चल दाखवं’ असे म्हणून आयफोन मोबाईल बळजबरीने घेण्याचा प्रयत्न केला़ यास यशने नकार देताच या दोघांनी बळजबरीने मोबाईल हिसकावला व फरार झाले़

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: nashik,car,two,suspects,mobile,snatching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.