कुलरचा गारवा घेताना विजेपासून सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 03:42 PM2019-04-17T15:42:35+5:302019-04-17T15:43:21+5:30

नाशिक : तप्त उन्हामुळे गारव्यासाठी मोठ्या प्रमाणात कुलरचा वापर केला जातो. परंतु अनेकदा कुलरचा वापर करताना त्यामध्ये विद्युत प्रवाह ...

nashik,careful,with,electricity,when,taking,cooler | कुलरचा गारवा घेताना विजेपासून सावधान

कुलरचा गारवा घेताना विजेपासून सावधान

googlenewsNext
ठळक मुद्देदक्षता : महावितरणकडून काळजी घेण्याचे आवाहन

नाशिक : तप्त उन्हामुळे गारव्यासाठी मोठ्या प्रमाणात कुलरचा वापर केला जातो. परंतु अनेकदा कुलरचा वापर करताना त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता असल्याने कुलरचा गारवा अनुभवताना सुरक्षिततेला अधिक प्राधान्य द्यावे आणि दक्षता बाळगावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
कुलर लावताना प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक दक्षता बाळगून, प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. अनेकवेळा अपघाताच्या घटनांमध्ये कुलरच्या जवळपास खेळणाऱ्या लहान मुलांचा समावेश असतो. त्यामुळे कुलरच्या सान्निध्यात लहान मुले येणार नाहीत, अशा पध्दतीने कुलरची मांडणी करावी, कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असल्यास लहान मुलांचा हात पंख्यात जाणार नाही याचीदेखील काळजी घेतली पाहिजे.
कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करणे अपेक्षित असते. मात्र अनेक लोक हे वीजप्रवाह सुरू असताना कुलरमध्ये पाणी भरतात. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. कुलरमधील वीजतारांचे (वायरचे) आवरण सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. कुलरमधून पाण्याची गळती होणार नाही याचीदेखील खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. वीज ग्राहकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून विद्युत अपघात टाळावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Web Title: nashik,careful,with,electricity,when,taking,cooler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.