बिटक्वाइनच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या मुंबईतील संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:28 AM2018-03-17T01:28:32+5:302018-03-17T01:28:32+5:30

जगभरातील कोणत्याही देशाची मान्यता नसलेले आभासी चलन बिटक्वाइन देण्याचे आमिष दाखवून संगमनेरच्या दोघांची सुमारे साडेआठ लाख रुपयांची आॅनलाइन फसवणूक करणाºया मुंबईतील संशयितास नाशिक शहर गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी सापळा रचून नाशिकमध्ये अटक केली़ नाजेश इस्मत झवेरी (रा़मीरा भार्इंदररोड, मुंबई, ईस्ट) असे या संशयिताचे नाव असून, त्यास न्यायालयात हजर केले असता २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

Mumbai suspect arrested in the name of Bitquine arrested | बिटक्वाइनच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या मुंबईतील संशयितास अटक

बिटक्वाइनच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या मुंबईतील संशयितास अटक

Next

नाशिक : जगभरातील कोणत्याही देशाची मान्यता नसलेले आभासी चलन बिटक्वाइन देण्याचे आमिष दाखवून संगमनेरच्या दोघांची सुमारे साडेआठ लाख रुपयांची आॅनलाइन फसवणूक करणाºया मुंबईतील संशयितास नाशिक शहर गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी सापळा रचून नाशिकमध्ये अटक केली़ नाजेश इस्मत झवेरी (रा़मीरा भार्इंदररोड, मुंबई, ईस्ट) असे या संशयिताचे नाव असून, त्यास न्यायालयात हजर केले असता २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ सोपान मनाजी उंडे (वय ३८, रा. मु. पो. गुंजाळवाडी, संगमनेर) यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे कामानिमित्त नाशिकमध्ये वास्तव्य असते़ काही महिन्यांपूर्वी त्यांची इंटरनेटच्या माध्यमातून संशयित झवेरीसोबत ओळख झाली़ त्याने स्वस्तात बीटक्वॉइन देण्याचे आमिष दाखवून ओळख वाढविली व या संदर्भात त्यांची मीरारोडवरील न्यू शाही रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये बैठक झाली़ त्यामध्ये पाच लाख ४० हजार रुपयात बीटक्वाइन देण्याचे सांगत उंडे यांनी मोबाइलवरूनच आयएमपीएस सुविधेद्वारे झवेरीच्या खात्यावर पैसे वर्ग केले़ यानंतर उंडे यांचे नातेवाईक विकास थोरात यांच्याकडूनही संशयिताने तीन लाख रुपये घेतले व उंडे यांच्या ब्लॉक चेन खात्यामध्ये बीटक्वॉइन ट्रान्सफर केले जातील, असे सांगितले़  उंडे व थोरात यांच्याकडून पैसे घेऊनही खात्यात बिटक्वॉइन ट्रान्सफर न झाल्याने तसेच संशयिताकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उंडे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली़ या प्रकरणी संशयित झवेरी विरोधात शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ संशयितास पकडण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, दीपक गिरमे, जाकिर शेख, चंद्रकांत पळशीकर, पोपट कारवाळ, रवींद्र बागुल, संजय मुळक यांनी सापळा रचून पाथर्डी फाटा परिसरातील एका खासगी हॉटेलमधून अटक केली़

Web Title: Mumbai suspect arrested in the name of Bitquine arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.