महावितरणची बिले थकली; ओझरकरांची वीज कापली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 11:09 PM2022-05-30T23:09:11+5:302022-05-30T23:09:55+5:30

ओझर : ओझर नगरपरिषदेने विद्युत बिले थकविल्यामुळे महावितरण कंपनीने ओझर गावासह उपनगरातील पथदीप व पाणीपुरवठ्याच्या कनेक्शनचा विद्युत पुरवठा रविवार (दि.२९) पासून खंडित केल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. विद्युत पुरवठा खंडित केल्याने ओझरसह उपनगरातील नागरिकांना पाण्यापासूनही वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

MSEDCL bills exhausted; Ojharkar's power cut! | महावितरणची बिले थकली; ओझरकरांची वीज कापली!

महावितरणची बिले थकली; ओझरकरांची वीज कापली!

googlenewsNext
ठळक मुद्देनगरपरिषदेला दणका : गाव बुडाले अंधारात, पाणीपुरवठ्यावरही होणार परिणाम

ओझर : ओझर नगरपरिषदेने विद्युत बिले थकविल्यामुळे महावितरण कंपनीने ओझर गावासह उपनगरातील पथदीप व पाणीपुरवठ्याच्या कनेक्शनचा विद्युत पुरवठा रविवार (दि.२९) पासून खंडित केल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. विद्युत पुरवठा खंडित केल्याने ओझरसह उपनगरातील नागरिकांना पाण्यापासूनही वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

ओझर नगरपरिषद हद्दीतील पथदीपासह पाणीपुरवठा विद्युत कनेक्शनची एकूण थकबाकी ६ कोटी २९ लाख ५४ हजार ६६० इतकी असून थकबाकी भरणा करणेबाबत महावितरण कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला. तसेच १५ दिवसांची अल्टिमेटम नोटीसहीदेखील देण्यात आली होती. परंतु नगरपरिषदेने थकबाकीचा भरणा केला नाही. परंतु मे महिन्याच्या बिलापोटी नगरपरिषदेने ७ लाख ६ हजार ६०२ रुपयांचा वीजबिलाचा भरणा करण्यासाठी महावितरणला धनादेश दिला.

थकबाकी रकमेच्या तुलनेत भरणा केलेली रक्कम अत्यल्प अशी एकच महिन्याची असल्याने उर्वरित थकबाकी रक्कम वसूल व्हावी म्हणून महावितरण कंपनीने सदर धनादेश मुख्याधिकारी ओझर नगरपरिषद यांना परत पाठवित. आपण थकबाकीच्या रकमेपोटी दरमहिन्याला किती रक्कम देणार याचा आराखडा द्यावा, असे एका पत्राद्वारे कळविले असता त्याला उत्तर म्हणून नगरपरिषदेने पुढील महिन्यापासून बिलाबरोबर थकबाकीपोटी १ लाखाची रक्कम भरेल असे महावितरणला पत्राद्वारे कळविले. उपविभाग अधिकाऱ्यांनी ते पत्र पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे.

अल्टिमेटम संपल्यावर कारवाई
महावितरणला दिलेल्या ११ ते २६ मे अशा पंधरा दिवसांच्या अल्टिमेटमनुसार नगरपरिषदेने थकबाकीचा भरणा केला नाही म्हणून महावितरणने रविवारी सायंकाळी ओझर नगरपरिषद हद्दीतील पथदीपांसह पाणीपुरवठा कनेक्शनचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, तसेच त्याचा पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार असल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

महावितरणने ओझर नगरपरिषदेला थकबाकी रक्कम भरणा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. त्या मुदतीत नगर परिषदेने भरणा न केल्याने नाइलाजास्तव पथदीपांचे व पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित करावा लागला आहे. ओझर नगरपरिषदेने थकबाकीचा भरणा करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे.
- योगेश्वर पाटील, उपकार्यकारी अभियंता, ओझर उपविभाग

Web Title: MSEDCL bills exhausted; Ojharkar's power cut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.