मनपा उद्यानातून तीन चंदनाच्या झाडांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:44 AM2017-07-27T00:44:38+5:302017-07-27T00:44:54+5:30

पंचवटी :मखमलाबाद येथील महापालिकेच्या मानकर उद्यानातून पहाटेच्या सुमाराला तीन चंदनाची झाडे कटरच्या साहाय्याने तोडून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

manapaa-udayaanaatauuna-taina-candanaacayaa-jhaadaancai-caorai | मनपा उद्यानातून तीन चंदनाच्या झाडांची चोरी

मनपा उद्यानातून तीन चंदनाच्या झाडांची चोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : भुरट्या चोरट्यांनी आता तर थेट महापालिकेच्या मालमत्तेवर वक्रदृष्टी फिरविली असून, मखमलाबाद येथील महापालिकेच्या मानकर उद्यानातून पहाटेच्या सुमाराला तीन चंदनाची झाडे कटरच्या साहाय्याने तोडून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मनपाच्या उद्यान विभागाचे कर्मचारी राहुल खांदवे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मखमलाबाद शिवारात महापालिकेचे मानकर उद्यान असून, या उद्यानात प्रशासनाने काही दिवसांपूर्वी चंदनाची झाडे लावलेली होती. बुधवारी (दि. २६) पहाटेच्या सुमाराला अज्ञात चोरट्यांनी उद्यानात प्रवेश करून तीन झाडे बुंध्यापासून कापून नेत चोरी केली आहे. सकाळच्या सुमाराला काही नागरिक उद्यानात गेल्यानंतर झाडे चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी प्रभागाचे नगरसेवक पुंडलिक खोडे यांना माहिती कळविली. या घटनेनंतर मनपाच्या उद्यान विभागाचे कर्मचारी राहुल खांदवे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून चंदनाची झाडे चोरून नेल्याबाबत म्हसरूळ पोलिसांत धाव घेतली होती. परिसरात दाट लोकवस्ती असताना चोरट्यांनी मनपाच्या उद्यानात जाऊन चंदनाची झाडे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: manapaa-udayaanaatauuna-taina-candanaacayaa-jhaadaancai-caorai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.