मालेगाव, चांदवड, सिन्नर : शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त बालकवी संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:15 AM2018-03-02T00:15:18+5:302018-03-02T00:15:18+5:30

मालेगाव : शहर व तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालय, संस्थांमध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

Malegaon, Chandwad, Sinnar: Various programs in schools, colleges, Balvik Sabha meeting on Marathi language day | मालेगाव, चांदवड, सिन्नर : शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त बालकवी संमेलन

मालेगाव, चांदवड, सिन्नर : शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त बालकवी संमेलन

Next
ठळक मुद्देमराठी भाषेचा जागर करण्यात आलादोन गटात गीत गायन स्पर्धा घेण्यात आली

मालेगाव : शहर व तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालय, संस्थांमध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रम घेऊन मराठी भाषेचा जागर करण्यात आला. मालेगाव येथील सौ. रु. झुं. काकाणी कन्या विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती आर. एन. देसले या होत्या. यावेळी देसले, एन. पी. गवळी, विद्यार्थिनी जान्हवी जाधव, गायत्री जगताप, उन्नती पाटील, मानसी भावसार, नुतन पगार यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर दोन गटात गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. यात पाचवी ते सातवी गटात प्रथम- प्राची सैंदाणे, द्वितीय श्रेया घोडके, तृतीय नूतन पगार तर आठवी ते नववीच्या मोठ्या गटात पायल जगताप, जयश्री राजभोज, संजना ढिवरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.  क. काकाणी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मोरे हे होते. यावेळी ठोंबरे, उपप्राचार्य मांडवडे, विद्यार्थिनी सोनाली साळुंके, करिष्मा अहिरे, चिरायू कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास एस. जी. कुलकर्णी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.आरबीएच कन्या विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या एम. आर. हिरे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शोभा बडवे या उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थिनी संजना अहिरे, प्रचीती पाटील, श्रुती पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक टी. आर. निकम यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास उपप्राचार्य आर. जी. पाटील, पर्यवेक्षक एस. यू. निकम, एल. टी. पाटील, सी. टी. कापडणीस, एल. ए. भदाणे, ई. ए. बागुल, शिक्षक, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Web Title: Malegaon, Chandwad, Sinnar: Various programs in schools, colleges, Balvik Sabha meeting on Marathi language day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.