भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:24 AM2019-05-19T00:24:36+5:302019-05-19T00:25:19+5:30

बुद्धस्मारक, त्रिरश्मी लेणी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अंगावर पांढरे वस्त्र परिधान करीत शेकडो महिला व पुरुष उपासकांनी हजेरी लावली.

Lord Gautam Buddha Jayanti Celebration | भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी

भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी

googlenewsNext

इंदिरानगर : बुद्धस्मारक, त्रिरश्मी लेणी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अंगावर पांढरे वस्त्र परिधान करीत शेकडो महिला व पुरुष उपासकांनी हजेरी लावली.
यावेळी भन्ते सुगत थेरो, भन्ते आर्य नाग, भन्ते विमत कीर्ती, भन्ते धम्म रक्षित यांनी बुद्ध वंदना घेतली पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पूजनीय भदंत युनागधम्मो महाथेरो व आमदार सीमा हिरे याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक भगवान दोंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते. भिक्खू संघाच्या वतीने बौद्ध मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, भोजनदान दिले गेले. आंबेडकरी कलावंत संतोष जोंधळे यांच्या बुद्ध-भीम गीतांचा समाज प्रबोधनपर भीम संध्या कार्यक्र म सादर करण्यात आला.
बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त बुद्ध स्मारकास विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

Web Title: Lord Gautam Buddha Jayanti Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.