कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 05:53 PM2018-12-23T17:53:02+5:302018-12-23T17:54:05+5:30

देवळा : तालुक्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्शभूमीवर आगामी काळात जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर उजवा कालवा तसेच रामेश्वरपासून पुढील चणकापूर वाढीव कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल अहेर तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या हस्ते करण्यात आला.

Launch of work to increase the flow of canal | कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ

देवळा येथील शासकीय विश्रामगृहावर लोकसहभागातून चणकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामाचा रामेश्वर येथे शुभारंभ करतांना आमदार डॉ. राहुल अहेर, केदा अहेर, विजय पगार, समवेत रामेश्वर व परीसरातील शेतकरी.

Next
ठळक मुद्देचणकापूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून रामेश्वर येथील उपक्रममपंचायत पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांची देवळा येथे शासकीय विश्रामगृहावर बैठक

देवळा : तालुक्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्शभूमीवर आगामी काळात जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर उजवा कालवा तसेच रामेश्वरपासून पुढील चणकापूर वाढीव कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल अहेर तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार यांनी हया कामासाठी रामेश्वर गावातून २ लाख ५१ हजार रूपये लोकवर्गणी जमा करून देण्याचे आश्वासन दिले. १० डिसेंबर रोजी तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांची देवळा येथे शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी लोकसहभागातून चणकापूर ते उमराणा येथील परसुल धरणापर्यंत कालव्याची वहन क्षमता वाढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. या कामासाठी टाटा ट्रस्ट युवा मित्र मोफत मशिनरी पुरवणार असून लोकसहभागातून इंधन खर्च करण्यात येणार आहे. सद्या असलेली कालव्याची वहन क्षमता दिडपट वाढविण्यासाठी कालव्याची आवश्यक तेथे उंची वाढवणे, गाळ काढणे, स्वच्छता करणे आदी उपाय करण्यात येणार आहे. रामेश्वर ते उमराणा येथील परसुल धरणापर्यंत वाढीव कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामाचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला आहे. रामेश्वर, सुभाषनगर, वाखारवाडी, वाखारी, खुंटेवाडी, उमराणे, पिंपळगाव (वा), दहिवड, मेशी, आदी लाभक्षेत्रात येणाºया गावातील ग्रामपंचायत, नागरीक व शेतकरी आदी लाभार्थ्यांनी कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामात सहभागी होउन सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉ. राहुल अहेर यांनी यावेळी केले आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार, संभाजी अहेर, बापू देवरे, दत्तु अहेर, माणिक पगार, दुला अहेर, मनु अहेर, हरी पगार, नाना अहेर, सुभाष खैर, रामराव मगर, सुखदेव पगार, राजेंद्र केदारे, चिंतामण पगार, बाबुलाल बागुल, किशोर पगार, रामदास पगार, संदीप पगार, भिका पगार, रामदास पगार, गुलाब पगार, कारभारी पगार, भरत पगार, आदींसह शेतकरी उपस्थित होते.
चणकापूर उजव्या कालव्यासाठी शासनाने संपादीत केलेल्या क्षेत्रात असलेल्या अनधिकृत विहीर मालकांना लवकरच नोटीस काढून त्यांच्यावर कारवाई करणार आहोत.
- जी. आर. काकुळते (उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग)

Web Title: Launch of work to increase the flow of canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.