देवळा तालुक्यात मका पीकाच्या आॅनलाईन नोंदणीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:07 PM2018-11-12T13:07:34+5:302018-11-12T13:07:56+5:30

देवळा : येथे शासकीय आधारभूत किंमत १७०० रु पये प्रति क्विंटल दराने मका खरेदीसाठी आॅनलाईन बुकिंगचा शुभारंभ शेतकी संघाचे अध्यक्ष चिंतामण अहेर यांच्या हस्ते करण्यात आला.

 Launch of online registration of maize peak in Deola taluka | देवळा तालुक्यात मका पीकाच्या आॅनलाईन नोंदणीचा शुभारंभ

देवळा तालुक्यात मका पीकाच्या आॅनलाईन नोंदणीचा शुभारंभ

Next

देवळा : येथे शासकीय आधारभूत किंमत १७०० रु पये प्रति क्विंटल दराने मका खरेदीसाठी आॅनलाईन बुकिंगचा शुभारंभ शेतकी संघाचे अध्यक्ष चिंतामण अहेर यांच्या हस्ते करण्यात आला. विठेवाडी येथील बाळासाहेब गमण निकम हया शेतकऱ्याच्या मका पीकाची आॅनलाईन नोंदणी करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आतापर्यंत २६८ शेतक-यांनी मका पीकाची आॅनलाईन नोंदणी केली असल्याची माहिती व्यवस्थापक गोरख अहेर यांनी दिली आहे.  शेतकरी संघाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्र मासाठी सहायक निबंधक संजय गीते, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे, योगेश अहेर, सचिव दौलतराव शिंदे आदी उपस्थित होते.
जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या माध्यमातून देवळा तालुका शेतकरी संघाची उप अभिकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सन २०१८/१९ खरीप पणन हंगाम आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत प्रति क्विंटल १७०० रु पये दराने शेतकरी संघामार्फत मका खरेदी केला जाणार आहे. यासाठी शेतक-यांनी चांगल्या प्रतिचा स्वच्छ व कोरडा केलेला मका आणावयाचा आहे. हया मक्याची आर्द्रता १४ टक्के विहीत करण्यात आलेली आहे. आॅनलाईन बुकिंग करण्यासाठी शेतकºयांनी मका पीकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार
क्र मांक, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल क्र मांक इत्यादी शेतकरी संघाच्या कार्यालयात जमा करून नोंदणी करून घ्यावी व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंतामण अहेर यांनी केले आहे. यावेळी शेतकरी संघाचे उपाध्यक्ष संजय गायकवाड, अतुल अहेर, अमोल अहेर, बापू अहेर, महेंद्र अहेर,डॉ. राजेंद्र ब्राम्हणकर, साहेबराव सोनजे, सुनिल देवरे आदी संचालक व शेतकरी उपस्थित होते.

Web Title:  Launch of online registration of maize peak in Deola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक