लासलगावच्या डॉक्टरला पाच लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 02:25 PM2019-03-01T14:25:25+5:302019-03-01T14:25:32+5:30

लासलगांव : तिप्पट नकली नोटा देण्याचे प्रलोभन दाखवून लासलगावच्या डॉक्टरला पाच लाख रूपयांना गंडा घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री येथील टोळीला पोलिसांनी जेरबंद केले.

Lasalgaon doctor gets five lakhs | लासलगावच्या डॉक्टरला पाच लाखांना गंडा

लासलगावच्या डॉक्टरला पाच लाखांना गंडा

Next

लासलगांव : तिप्पट नकली नोटा देण्याचे प्रलोभन दाखवून लासलगावच्या डॉक्टरला पाच लाख रूपयांना गंडा घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री येथील टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. लासलगाव येथील रहिवासी डॉ. विकास निवृत्ती चांदर (३८) यांना राजेंद्र संपत ढोमसे रा. मालपुर, तालुका साक्र ी जिल्हा धुळे याने नकली नोटा मिळवून देतो असे सांगून पाच लाख रु पयांची मागणी केली. पाच लाख रु पयांच्या खऱ्या नोटा दिल्यास १६ लाख रु पयांच्या नकली नोटा देऊ असे सांगून विसरवाडी येथील इंडियन आॅइल पेट्रोल पंपच्या मागील बाजूस बोलावले. त्यानुसार चांदर यांनी दिनांक २६ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता ढोमसे याची भेट घेतली आणि पाच लाख रु पये दिले. नकली नोटा ताब्यात घेण्यासाठी चांदर हे ढोमसेच्या सांगण्यावरून विसरवाडी बसस्थानक परिसरात गेले. तेव्हा ढोमसेचे साथीदार अशोक धोंडू मोरे (जोगी), रा. धाडने, गौरव दिलीप अहिरराव, रा. धाडने,केतन भास्कर मोरे, रा. धाडने, जितेंद्र नवल मालचे, सर्व राहणार धाडणे तालुका साक्र ी यांनी पोलीस छापा पडल्याचा बनाव रचला आणि धावाधाव केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तातडीने तपासचक्र े फिरवून पाठलाग केला. धुळे सुरत हायवेवर चित्तथरारक पाठलाग करत सापळा रचत मुद्देमालासह पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. संबंधितांना न्यायालयापुढे हजर केले असता ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील तपास करत आहे.

Web Title: Lasalgaon doctor gets five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक