पिकअप-मोटारसायकल धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:06 AM2018-10-12T01:06:08+5:302018-10-12T01:06:24+5:30

लोहोणेर - देवळा रस्त्यावरील सरस्वतीवाडी शिवारात झालेल्या पिकअप व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

A killer in pick-up motorcycle crash | पिकअप-मोटारसायकल धडकेत एक ठार

पिकअप-मोटारसायकल धडकेत एक ठार

Next

लोहोणेर : लोहोणेर - देवळा रस्त्यावरील सरस्वतीवाडी शिवारात झालेल्या पिकअप व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुगाव (ता. चांदवड) येथील रहिवासी व लासलगाव (ता. निफाड) येथे वीज वितरण कंपनीत वरिष्ठ तांत्रिक म्हणून नोकरीस असलेले वीरेश श्रीधर सोनवणे (३०) हे माळवाडी येथे आपल्या चुलत शालाकाच्या अंत्यविधिस प्लॅटिना मोटारसायकलने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या पिकअपने ( एमएच ४१ एजी १०७०) जोरदार धडक दिल्याने वीरेश सोनवणे हे जागीच ठार झाले. मयत सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याबाबत देवळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक एस.एस. सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. एम. दिवटे करीत आहेत.

Web Title: A killer in pick-up motorcycle crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.