खंडेबा टेकडी कुस्तीच्या दंगलीत जाधव मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:08 AM2018-12-15T01:08:14+5:302018-12-15T01:08:37+5:30

बजरंगबली व खंडेराव महाराज यांच्या नावाचा जयघोष करत व मल्लानी आपले दंड थोपटत प्रतिस्पर्ध्याला दिलेले आव्हान प्रेक्षकांचा मिळणार प्रतिसाद यामुळे येथील खंडोबा टेकडीवर रंगलेल्या कुस्ती स्पर्धा रोमहर्षक झाल्या़ अंतिम मानाच्या कुस्तीत पिंपळगाव बसवंतच्या संदीप जाधव या पहिलवानाने शेणीतच्या धनाजी जाधव यास तुल्यबळ लढत देत चितपट करत विजय मिळविला.

Khandwa hill wrestling riots Jadhav Mankari | खंडेबा टेकडी कुस्तीच्या दंगलीत जाधव मानकरी

खंडोबा टेकडीवर रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत संदीप जाधव या पहिलवानाने विजय मिळविला. याप्रंसगी बळवंत गोडसे, प्रकाश आमले यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Next
ठळक मुद्देतुल्यबळ लढत : खंडेराव महाराज यात्रोत्सव

देवळाली कॅम्प : बजरंगबली व खंडेराव महाराज यांच्या नावाचा जयघोष करत व मल्लानी आपले दंड थोपटत प्रतिस्पर्ध्याला दिलेले आव्हान प्रेक्षकांचा मिळणार प्रतिसाद यामुळे येथील खंडोबा टेकडीवर रंगलेल्या कुस्ती स्पर्धा रोमहर्षक झाल्या़ अंतिम मानाच्या कुस्तीत पिंपळगाव बसवंतच्या संदीप जाधव या पहिलवानाने शेणीतच्या धनाजी जाधव यास तुल्यबळ लढत देत चितपट करत विजय मिळविला.
खंडोबायात्रेत परंपरेनुसार दंगली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मानाच्या कुस्तीच्या दंगलीसाठी नाशिकसह शिंगवे बहुला, भगूर, पिंपळगाव खांब, साकूर आदि भागातील कुस्तीपटूंनी हजेरी लावत डावपेच दाखवले. स्पर्धेतील अंतिम व यात्रोत्सवाच्या कुस्त्यांमध्ये सलग दुसऱ्यांदा विजेता ठरलेला संदीप जाधव यास बळवंत गोडसे, प्रकाश आमले, उत्तम मांडे, वस्ताद भाऊसाहेब मोजाड, सतीश मेवानी, विठ्ठल कांडेकर, रतन पाळदे, सचिन गावंडे, वाजिद सय्यद आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून सचिन आमले, प्रवीण पाळदे आदींनी काम बघितले. मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कमलाकर आमले, नितीन आमले, प्रशांत म्हस्के, रोहित गायकवाड, सचिन आमले, सचिन झुटे, संजय गोडसे, रतन पाळदे, संदीप गांवडे आदी प्रयत्नशील होते.
पहिलवान मुलींच्या स्पर्धा
यावर्षी प्रथमच शिंगवे बहुला येथील वस्ताद स्व.पै.पंढरीनाथ पाळदे यांच्या स्मरणार्थ साकूर, भगूर व नाशिकमधून आलेल्या पहिलवान मुलींच्या स्पर्धा व छोट्या गटातील कुस्त्यादेखील प्रेक्षणीय ठरल्या.

Web Title: Khandwa hill wrestling riots Jadhav Mankari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.