...केवळ व्यापारी दोषी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:32 AM2018-06-24T00:32:37+5:302018-06-24T00:32:53+5:30

राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीची कारवाई करताना ज्या वस्तू कंपनीकडूनच प्लॅस्टिक, थर्माकोलमध्ये पॅकिंग होऊन येतात त्यांच्यावर कंपनीतच बंदी करून कारवाई करावी. किरकोळ विक्रेते, दुकानदार यांच्यावर प्लॅस्टिक पिशवीचा वापर केल्यास जरूर कारवाई करावी; मात्र कंपनी उत्पादकांकडून प्लॅस्टिक आवरणात आलेल्या वस्तूवरून व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये, अशी मागणी व्यापाºयांनी बैठकीत केली.

 ... just how guilty the merchant? | ...केवळ व्यापारी दोषी कसे?

...केवळ व्यापारी दोषी कसे?

Next

नाशिकरोड : राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीची कारवाई करताना ज्या वस्तू कंपनीकडूनच प्लॅस्टिक, थर्माकोलमध्ये पॅकिंग होऊन येतात त्यांच्यावर कंपनीतच बंदी करून कारवाई करावी. किरकोळ विक्रेते, दुकानदार यांच्यावर प्लॅस्टिक पिशवीचा वापर केल्यास जरूर कारवाई करावी; मात्र कंपनी उत्पादकांकडून प्लॅस्टिक आवरणात आलेल्या वस्तूवरून व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये, अशी मागणी व्यापाºयांनी बैठकीत केली.  प्लॅस्टिकबंदीवरून जेलरोड बीएमएस सुपर मार्केट येथे शनिवारी सायंकाळी व्यापारी व मनपा अधिकाºयांची संयुक्त बैठक झाली. यावेळी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी कुठल्या प्रकारच्या प्लॅस्टिक, थर्माकोलवर बंदी आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. प्लॅस्टिक वापरामुळे पर्यावरणाचा होत असलेला ºहास, भविष्यात होणारा त्रास यांची माहिती दिली.  यावेळी व्यापाºयांनी कुठल्याही प्रकारची प्लॅस्टिक पिशवी वापरणार नाही हे मान्य केले. मात्र उत्पादक, कंपनी, कारखाना यांच्याकडून प्लॅस्टिकच्या आवरणात आलेल्या वस्तू ठेवल्यावर त्यावर कारवाई करू नये अशी मागणी केली. अंतर्वस्त्र, चहा, कॉफी, साड्या, टीव्ही, फ्रीज अशा अनेक वस्तू कंपनी अथवा उत्पादकांकडून प्लॅस्टिकच्या आवरणात येतात. टीव्ही, फ्रीजसारख्या वस्तू वाहतुकीत नुकसान होऊ नये म्हणून थर्माकोलच्या पॅकिंगमध्ये येतात. त्या वस्तू आमच्याकडे विक्रीला आहे म्हणून व्यापाºयांवर कारवाई न करता संबंधित उत्पादक, कारखानदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी व्यापाºयांनी केली. चहा, कॉफी आदी काही खाद्य पदार्थ प्लॅस्टिकमध्ये न आल्यास सादळून जातील. त्यामुळे व्यापाºयांचे नुकसान होईल. प्लॅस्टिकबंदी महाराष्टÑात असून, इतर राज्यांतून प्लॅस्टिक पॅकिंगमध्ये आणलेल्या मालावरून व्यापाºयांवर कारवाई करू नका, अशी मागणी व्यापा-यांनी केली.  नोटाबंदी, जीएसटी व आता प्लॅस्टिकबंदी करून फक्त व्यापाºयांना वेठीस धरू नये, कोणत्या वस्तूवर बंदी आहे याची दुकानदार व जनतेला माहिती होण्यासाठी फलक लावावे, अशी मागणी व्यापाºयांनी केली. प्लॅस्टिकबंदीमुळे किरकोळ किराणा दुकानदाराने व्यवसाय कसा करावा असे विविध प्रश्न व्यापाºयांनी उपस्थित केल्यानंतर मनपा अधिकारीसुद्धा अनुत्तरित झाले.  दुकानात असलेला स्टॉक संपेपर्यंत मनपानेदेखील सहकार्य करावे, व्यापारीसुद्धा प्लॅस्टिकचा वापर टाळून सहकार्य करण्यास तयार आहेत; मात्र बंदीच्या नावाखाली पठाणी पद्धतीने कारवाई करू नये अशी मागणी व्यापाºयांनी केली.  बैठकीला नाशिकरोड देवळाली घाऊक व्यापारी असोसिएशनचे राजन दलवाणी, नेमीचंद बेदमुथा, राम साधवानी, सुनील बूब, सुरेश शेटे, रामेश्वर जाजू, दिलीप कोचर, सुंदरदास गोपालदास, होलाराम रामचंदानी, नरेश आमेसर, खुशाल आमेसर, सुभाष बेदमुथा, महावीर कुमट, गोरख शिरसाठ, संजय ताजनपुरे, अशोक कवडे आदींसह व्यापारी उपस्थित होते.

Web Title:  ... just how guilty the merchant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.