औद्योगिक वसाहतीत मिनी मॅरेथॉन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:01 AM2018-02-17T01:01:50+5:302018-02-17T01:02:12+5:30

निमा व सिन्नर अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी निमा मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. औद्योगिक क्षेत्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करून औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता व व्यायामाचे महत्त्व पोहोचवून ही स्पर्धा लक्षवेधी ठरली. महिला खुल्या गटात काजल नामदेव दळवी तर व पुरुष गटात दिनकर संतू लिलके यांनी निमा मॅरेथॉन २०१८ चे विजेतेपद पटकावले.

 Industrial colonial mini marathon tournaments | औद्योगिक वसाहतीत मिनी मॅरेथॉन स्पर्धा

औद्योगिक वसाहतीत मिनी मॅरेथॉन स्पर्धा

Next

सिन्नर : निमा व सिन्नर अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यासाठी निमा मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. औद्योगिक क्षेत्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करून औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता व व्यायामाचे महत्त्व पोहोचवून ही स्पर्धा लक्षवेधी ठरली. महिला खुल्या गटात काजल नामदेव दळवी तर व पुरुष गटात दिनकर संतू लिलके यांनी निमा मॅरेथॉन २०१८ चे विजेतेपद पटकावले.  आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर आमदार सुधीर तांबे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव, निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार, अतिरिक्त चिटणीस सुधीर बडगुजर, एस.के. नायर, संदीप भदाणे, अरुण चव्हाणके, किशोर इंगळे, मारुती कुलकर्णी, सुभाष कदम, शिवाजी आव्हाड, योगेश मोरे, सिन्नर अ‍ॅथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे, चिटणीस बाळासाहेब लोंढे, अविनाश पगारे आदी उपस्थित होते.  १३ वर्षांपासून स्पर्धेचे आयोजन केले जात असून, लहान वाटणाºया स्पर्धेने व्यापक रूप धारण केले असल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. १४ व्या मॅरेथॉन स्पर्धेत निमाने मोठे योगदान दिले आहे. स्पर्धेतून आतापर्यंत विविध खेळाडू राज्य व देशपातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा खेळाडू घडविणारी असल्याचे ते म्हणाले. विविध कारणांनी स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.  औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कर्मचारी व कामगारांना दैनंदिन कामाव्यतिरिक्त व्यायाम, स्वच्छता याबाबत जागरुकता होण्यासाठी स्पर्धा घेतल्याचे अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले. भविष्यातही अशा स्पर्धा घेणार असल्याचे प्रास्ताविकातून त्यांनी सांगितले.  स्पर्धेसाठी जिंदाल सॉ लि., मॅक फर्माटेक प्रा.लि., नूपुर इंडस्ट्रिज, ग्लोबल पॅकेजिंग, देश वायर प्रॉडक्ट्स प्रा. लि., रेसिस्टोटेक इंडस्ट्रिज प्रा.लि. यांनी सहकार्य केले. माधुरी पंडित यांनी सूत्रसंचालन केले.  सुधीर बडगुजर यांनी आभार मानले.
स्वच्छतेचा संदेश
औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी निमा व सिन्नर अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्र वारी ही स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी जिल्ह्यातून सुमारे २ हजार खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यातही अशा स्पर्धा घेणार असल्याचे प्रास्ताविकातून याप्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांसमोर सांगितले.

Web Title:  Industrial colonial mini marathon tournaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक