गोदावरीच्या पातळीत वाढ : गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:59 PM2018-07-16T13:59:01+5:302018-07-16T14:14:10+5:30

 Increase in the level of Godavari: Continuous water flow from Gangapur dam | गोदावरीच्या पातळीत वाढ : गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग

गोदावरीच्या पातळीत वाढ : गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग

Next
ठळक मुद्दे विसर्ग दूपारी एक वाजता विसर्ग ४७१६ क्यूसेकवर अग्निशामक दलाची यंत्रणा सज्ज गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. अवघ्या पंधरवड्यात ५० टक्के धरण भरले असून सकाळी अकरा वाजेपासून सातत्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. सुरूवातील १५७२ क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. त्यानंतर पुन्हा तासाभराने ३१४४ क्सूसेकने विसर्ग वाढविला व दूपारी एक वाजता विसर्ग ४७१६ क्यूसेकवर पोहचला आहे. यामुळे गोदावरीच्या पातळीत अचानकपणे वाढ झाली आहे. गोदाकाठालगतच्या रहिवाशांना नाशिक महापालिकेच्या अग्निशामक आपत्ती व्यवस्थापनाकडून सतर्क तेच्या सूचना दिल्या जात आहे. गोदाकाठापासून सुरक्षित अंतरावर स्थलांतरीत होण्याबाबात अग्निशामक दलाकडून आवाहन केले जात आहे. शहरातील सातपूर, पंचवटी, शिंगाडा तलाव, नाशिकरोड, अशा सर्वच उपकेंद्रातील प्रत्येकी एक बंब गोदाकाठाच्या परिसरात धोक्याचा इशारा देत गस्त करत आहे. गंगापूर धरणातून सुरू करण्यात आलेला विसर्ग पंचवटी येथील रामकुंडात दुपारी अडीच वाजेपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुरनियंत्रण कक्षासह जिल्हाधिकारी आपत्ती कक्ष, महापालिका आपत्ती कक्षाला सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


--
अग्निशामक दलाची यंत्रणा सज्ज
कुठल्याहीप्रकारची पुरपरिस्थी किंवा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक, कृत्रिम आपत्कालीन घटनांना सामोरे जाण्यासाठी नाशिक महापालिका अग्निशामक दलाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती शिंगाडा तलाव येथील मुख्यालयाचे उपकेंद्रीय अधिकारी दिपक गायकवाड यांनी दिली. अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक हायड्रोलिक शिडी, साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी डिझेल पंप, झाडे, घरे, वाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये उपयोगात येणारे वुड कटर, स्टील कटर, मेटल कटरही उपलब्ध आहेत. तसेच पूरपरिस्थिती उद्भवल्यास चार रबर बोट, दोन फायबर बोट, लाईफ रिंग, लाईफ जॅकेट, दोरखंड आवश्यकतेनुसार उपलब्ध आहेत. यासोबतच फोल्डींग स्ट्रेचर, फोल्डींग लॅडर, एक्सटेंशन लॅडरचाही यांत्रिक साहित्यसामुग्रीत समावेश आहे.



 

Web Title:  Increase in the level of Godavari: Continuous water flow from Gangapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.