विल्होळीला जनावरांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:21 AM2018-07-25T00:21:42+5:302018-07-25T00:22:00+5:30

येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने परिसरातील जनावरांचे लसीकरण लांबणीवर पडले. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘उपचाराअभावी जनावरे दगावली’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती नाशिक डॉ. कविता पाटील व डॉ. महेंद्र सोनवणी (पशुधन परिवेक्षक) यांनी विल्होळी व परिसरातील प्रत्येक शेतात जाऊन जनावरांना लसीकरण केले.

 Immunization of animals in Vilholi | विल्होळीला जनावरांचे लसीकरण

विल्होळीला जनावरांचे लसीकरण

googlenewsNext

विल्होळी : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने परिसरातील जनावरांचे लसीकरण लांबणीवर पडले. याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘उपचाराअभावी जनावरे दगावली’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती नाशिक डॉ. कविता पाटील व डॉ. महेंद्र सोनवणी (पशुधन परिवेक्षक) यांनी विल्होळी व परिसरातील प्रत्येक शेतात जाऊन जनावरांना लसीकरण केले. पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत विल्होळी, सारूळ, राजूर बहुला, आंबे बहुला, पिंपळद, रायगडनगर ही गावे येत असून, मोठा परिसर असल्याने पशुधन संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्व पशूंना टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याचे योजिले असून, सुरु वातीला विल्होळी व विल्होळी परिसरातील पशूंना लसीकरणास सुरु वात झाली.  आमच्याकडे गायी, म्हशी अशी अनेक जनावरे असून, पावसाळ्यापूर्वी त्यांना लसीकरण गरजेचे होते; परंतु कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने ते लांबणीवर पडले. लोकमतने बातमी प्रसिद्ध केल्याने उशिरा का होईना आमच्या जनावरांना पशुधन विकास अधिकारी डॉ. कविता पाटील व डॉ. महेंद्र सोनवणी यांनी शेतावर येऊन पशूंना लसीकरण केले.
- अंकुश चव्हाण, शेतकरी, विल्होळी

Web Title:  Immunization of animals in Vilholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.