पतीने फेसबूकवर बदनामी केल्याने विवाहितेची आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 07:03 PM2018-09-03T19:03:39+5:302018-09-03T19:10:11+5:30

अमोल याची बहिण मनिषा प्रशांत कवडे उर्फ मनिषा चिने ( ३८) हीचा प्रशांत कवडे यांच्याबरोबर तिचा दुसरा विवाह करून दिला. लग्नाच्या काही दिवसानंतर प्रशांत याने पत्नीच्या चारित्रत्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.

Husband's suicide due to defamation by husband on Facebook | पतीने फेसबूकवर बदनामी केल्याने विवाहितेची आत्महत्त्या

पतीने फेसबूकवर बदनामी केल्याने विवाहितेची आत्महत्त्या

googlenewsNext
ठळक मुद्दे पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने या महिलेने आत्महत्या केली पोलीसांनी पती व सासू विरोधात गुन्हा दाखल केला

नाशिक : चारित्र्याचा संशय घेवून रो-हाऊससाठी दहा लाख रूपये आणावे यासाठी पत्नीचा छळ करून तिच्याच नावाने खोटे फेसबुक अकाउंट तयार करून पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने या महिलेने आत्महत्या केली याप्रकरणी इंदिरानगर पोलीसांनी पती व सासू विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमोल मच्छिंद्र चिने यांनी याप्रकरणी पोलीसांत तक्रार दिली आहे. अमोल याची बहिण मनिषा प्रशांत कवडे उर्फ मनिषा चिने ( ३८) हीचा प्रशांत कवडे यांच्याबरोबर तिचा दुसरा विवाह करून दिला. लग्नाच्या काही दिवसानंतर प्रशांत याने पत्नीच्या चारित्रत्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मनिषा यांनी आपल्या पतीस बँकेतून २८हजार रूपये काढून दिले. रो-हाऊस घेण्यासाठी दहा लाखाची मागणी मनिषा हीच्याकडे तिच्या पतीने केली. तिने नकार दिल्यानंतर पती प्रशांत याने मनिषा हीच्या नावाने फेसबुक अकाउंट तयार करून तिची बदनामी करण्यास सुरुवात कली. हा प्रकार मनिषा हीच्या लक्षात आल्यावर तीने गळफास धेवून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर भाऊ अमोल याने इंदिरानगर पोलीसांत याबाबत तक्रार दिली आहे. प्रशांत कवडे यांचेही यापूर्वी लग्न झालेले असून त्यांच्या पत्नीही अशाच प्रकारे आत्महत्या केली असल्याचे पोलीसांनी सांगितले.
हिने आत्महत्त्या केली

 

 

 

Web Title: Husband's suicide due to defamation by husband on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.