...त्यांनी उलगडला २२ देशांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:57 AM2019-06-24T00:57:47+5:302019-06-24T00:58:08+5:30

आपल्याकडे समाजनिर्मितीला लग्नसंस्थेशी आणि संस्कारांशी जोडण्यात आलेले आहे. कुटुंबातील माता शिकली तर अख्ये कुटुंब शिक्षित होते, परंतु त्याही पुढे जाऊन शिक्षणाबरोबरच मातेचे संस्कारही मुले घडवित असल्याने भारतीय कुटुंबव्यवस्थेतील हा संस्कार इतर देशांपुढे मांडण्यासाठी सुरू केलेला प्रवास सफल झाला,

 ... he travels to 22 countries in the open | ...त्यांनी उलगडला २२ देशांचा प्रवास

...त्यांनी उलगडला २२ देशांचा प्रवास

Next

नाशिक : आपल्याकडे समाजनिर्मितीला लग्नसंस्थेशी आणि संस्कारांशी जोडण्यात आलेले आहे. कुटुंबातील माता शिकली तर अख्ये कुटुंब शिक्षित होते, परंतु त्याही पुढे जाऊन शिक्षणाबरोबरच मातेचे संस्कारही मुले घडवित असल्याने भारतीय कुटुंबव्यवस्थेतील हा संस्कार इतर देशांपुढे मांडण्यासाठी सुरू केलेला प्रवास सफल झाला, अशी भावना ‘मदर्स आॅन व्हील’ संकल्पना राबविणाऱ्या मातांनी व्यक्त केल्या.  भारतीय कुटुंबव्यवस्था आई आणि मूल यांच्यातील अनोख्या भावबंधनाची आणि संस्कशराची महती सांगण्याचा उपक्रम घेऊन कारमधून २२ देशांचा प्रवास करणाºया  माधुरी सहस्त्रबुद्धे (दिल्ली), शीतल वैद्य-देशपांडे (पुणे), उर्मिला जोशी (पुणे) आणि माधुरी सिंग (ग्वाल्हेर) या चौघींनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या ‘चारचौघीं’चा या प्रवासाचा अनुभव कसा होता, याविषयी गंगापूररोडवरील शंकराचार्य संकुल येथे या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या अनुभवाचा प्रवास उलगडला.
दिल्ली ते नेपाळ आणि चायना मार्गे युरोपातील देशांमध्ये मातृत्वाचा प्रसार कसा होता, याविषयी त्यांनी अनुभव कथन केले. आजच्या काळात कुटुंबव्यवस्थेच्या संस्काराला आव्हान देणाºया अनेक संकल्पना मान्य पावत आहेत.
कोणत्याही संस्काराशिवाय एकत्र राहाणे आणि विभक्त होण्याची सहजप्रक्रिया यातून निर्माण होणाºया नातेसंबंधाच्या गोंधळातून समाजातील वातावरण कलुषित झाले आहे. कुटुंबातील मातेचे महत्त्व आणि मातेने केलेल्या संस्कारावर घडणारी पिढी याचे भावबंध या चौघींनी २२ देशांत रूजविले.
महिला असतानाही केवळ कारने २२ देशांचा प्रवास, त्यासाठी लागणाºया परवानग्या, तेथील भाषा आणि चलनांचा फरक, राहण्याचे ठिकाण, अडचणीतील रस्ते यातून मार्ग काढत युरोपीय देशांमध्ये पोहोचण्याचा अवघड प्रवास त्यांनी मांडला. स्वरदा लगड यांनी त्यांची मुलाखत घेतली.

Web Title:  ... he travels to 22 countries in the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.