नवजात अर्भकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:41 AM2018-08-15T01:41:38+5:302018-08-15T01:42:24+5:30

नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़

 Half reduction in infant mortality | नवजात अर्भकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट

नवजात अर्भकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट

googlenewsNext

नाशिक : नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़ यात शासन व आरोग्य विभागाने सुधारणा केल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट झाल्याचा दावा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि़१४) केला़ जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत नवजात बालकांच्या एसएनसीयू विभागाची पाहणी केली़ आदिवासी भागातील बालमृत्यू रोखण्यासाठी कळवण आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये एसएनसीयू विभाग सुरू करण्यास मंजुरी दिल्याचेही सावंत यांनी सांगितले़  एसएनसीयू विभागात उपचारासाठी दाखल ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना गतवर्षी घडली होती़ यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती़ याची दखल घेत आरोग्यमंत्री सावंत यांनी रुग्णालयास भेट देऊन उपाययोजनांची अंमलबजावणीचे आदेश दिले होते़  तसेच जिल्हा रुग्णालयासाठी तातडीने सोयीसुविधाही पुरविण्यात आल्याने १५ टक्के नवजात बालकांचा मृत्यूदर ८़३ टक्क्यांवर आला आहे़ राज्यातील एकमेव माता-नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) नाशिकमध्ये तयार होत असून, यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित डॉक्टरांसह परिचारिका तसेच तज्ज्ञ न्युआॅनॅटोलॉजिस्टचा कर्मचारीवर्गही मंजूर करण्यात आला आहे़  नवजात अर्भकांवरील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय व मालेगाव याठिकाणी एसएनसीयू कक्ष असून, या कक्षांप्रमाणेच त्र्यंबकेश्वर व कळवण या ठिकाणीही १२ बेडचा स्वतंत्र एसएनसीयू कक्ष येत्या सहा महिन्यांत सुरू होणार आहे. कुपोषित माता व कुपोषित बालके यांच्यासाठी जिल्ह्णातील सहा तालुक्यांमध्ये मॅम-सॅम युनिट सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर यांचा समावेश आहे़ याबरोबरच माताबालक केंद्र तयार केले जाणार असून, गर्भवती मातांसाठीचा अतिदक्षता विभाग स्वतंत्र असल्याचेही सावंत यांनी सांगितले़  यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली़ यावेळी डॉ़ पंकज गाजरे, डॉ़ कृष्णा पवार, डॉ़ नरेंद्र बागुल, डॉ़ सुप्रिया गोरे उपस्थित होते़
कुपोषणात ३० टक्क्यांनी घट
पंचसूत्री उपाययोजना व लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे पालघरमधील कुपोषण ३० टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे़ त्यामुळे नाशिक आणि मेळघाट या ठिकाणीही हाच पॅटर्न राबविण्यात येणार आहे़
- डॉ़ दीपक सावंत, आरोग्यमंत्री

 

Web Title:  Half reduction in infant mortality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.