ऐन सणासुदीत किराणा मालाचे भाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:40 AM2018-10-12T00:40:24+5:302018-10-12T00:42:53+5:30

Gross prices of grocery commodities rose sharply | ऐन सणासुदीत किराणा मालाचे भाव तेजीत

ऐन सणासुदीत किराणा मालाचे भाव तेजीत

googlenewsNext
ठळक मुद्देउपवासाला महागाईचा फटका खर्चाचा ताळमेळ बसवताना गृहिणी मेटाकुटीस

नाशिक : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गृहिणींना महागाईने जेरीस आणले आले. उपवास, नैवेद्याचे पदार्थ कसे करायचे, इंधन, गॅस आदी साऱ्यांचेच भाव वाढलेले असताना आता त्या धान्याचे भाव वाढल्याने खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने जाहीर केलेले हमीभाव आणि वाढलेले इंधनाचे भाव यामुळे धान्यांचे भाव वाढले आहेत.
त्यातही हरबरा, मूगडाळ, साखर यांचे भाव तर १० ते १५ टक्क्यांनी वाढले असून सण साजरा तरी कसा करायचा, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. सध्या हरबरा डाळ ६० ते ७० रुपये किलो, मूगडाळ ७५ ते ८० रुपये किलो, साबुदाणा ६० रुपये किलो, भगर ७० रुपये किलो, साखर ३५ रुपये किलो, नारळ २० रुपये प्रतिनग, गूळ ४५ ते ५० रुपये किलो, सूर्यफूल तेल ९५ ते १०० रुपये प्रति पाऊच, शेंगदाणा तेल १२० रुपये लिटर, तूप ५५० ते ६०० रुपये किलो असे किराणाचे दर असून गणेशोत्सवादरम्यान याच वस्तूंचे भाव ५ ते १० रुपयांनी कमी होते.
इंधन दरवाढ, त्यामुळे मजुरी, वाहतूक, कर अशा सगळ्यांच बाबतीत दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामन्य ग्राहक त्रस्त झाले आहेत.

Web Title: Gross prices of grocery commodities rose sharply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.