जिल्ह्यातील  २८ हजार शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:35 AM2018-12-22T01:35:12+5:302018-12-22T01:35:42+5:30

कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण व त्यामुळे उत्पादक शेतकºयांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केल्यानुसार त्याचा लाभ जिल्ह्यातील २८ हजार ३५३ शेतकºयांना होणार आहे.

 Grant profit to 28 thousand farmers in the district | जिल्ह्यातील  २८ हजार शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ

जिल्ह्यातील  २८ हजार शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ

Next

नाशिक : कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण व त्यामुळे उत्पादक शेतकºयांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केल्यानुसार त्याचा लाभ जिल्ह्यातील २८ हजार ३५३ शेतकºयांना होणार आहे. १७  बाजार समित्यांमध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर या एका महिन्याच्या कालावधीत सुमारे ३५ लाख क्विंटलहून अधिक कांद्याची विक्री करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.  नाशिक जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाळ कांद्याचे भाव सातत्याने घसरू लागले असून, ५० पैसे ते एक रुपये दराने कांदा विक्री झाल्याने शेतकºयांमध्ये संतापाची भावना आहे. त्यातून बाजार समित्यांचे कामकाज बंद पाडणे, रस्त्यावर कांदा ओतणे, सरकारच्या विरोधात रास्ता रोको अशा स्वरूपाचे आंदोलने केली जात आहे. भाव कोसळल्यामुळे शेतकºयांनी कांदा बाजार समितीत आणणे बंद केले, परिणामी चाळीतही कांदा सडू लागला आहे. अगोदरच दुष्काळी परिस्थिती असताना त्यात कांदा उत्पादक शेतकºयांचा रोष सरकारला महागात पडू शकतो हे हेरून शासनाने दि. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला असून, शासनाने सहकार खात्याकडून प्रत्येक जिल्ह्णाची माहिती मागविली आहे. नाशिक जिल्ह्णातील १७ बाजार समित्यांमध्ये गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत २८ हजार ३५३ शेतकºयांनी ३५ लाख ८८ हजार १९१ क्विंटल कांद्याची पडत्या भावात विक्री केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार कांदा उत्पादक शेतकºयांना पाच कोटी ६ लाख ७० हजार ६०० रुपये अनुदान अदा केले जाणार आहे. जिल्ह्णाच्या बाजार समित्यांमध्ये लगतच्या कोपरगाव, श्रीरामपूर आदी ठिकाणच्या शेतकºयांनीही कांदा विक्री केलेला असल्यामुळे आकडेवारीत कमी अधीक होण्याची शक्यता जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी व्यक्त केली आहे.

Web Title:  Grant profit to 28 thousand farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.