स्वातंत्र्यदिनानंतर सरकारची लक्तरे वेशीवर : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 06:04 PM2018-07-29T18:04:23+5:302018-07-29T18:08:48+5:30

‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने रविवारी (दि.२९) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद यात्रेअंतर्गत जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आंबेडकरप्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

On the gates of government after Independence: Prakash Ambedkar | स्वातंत्र्यदिनानंतर सरकारची लक्तरे वेशीवर : प्रकाश आंबेडकर

स्वातंत्र्यदिनानंतर सरकारची लक्तरे वेशीवर : प्रकाश आंबेडकर

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपा सरकार आणि नरेंद्र मोदी यांची लक्तरे चव्हाट्यावर आणण्याची मोहीम हाती घेऊशेतकऱ्यांना हमीभाव वाढीचे दिलेले आश्वासन हे फसवे मोदी सरकार जाती-धर्माचे विष कालवणारे म्हणून लोकांपुढे आले.

नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समतेचे पाईक नसून विषमतेला खतपाणी घालणारे आहे. कॉँग्रेस सरकारचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने लोकांनी त्यांना सत्तेवरून बाजूला केले आणि भाजपाला बहुमत दिले. यामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले; मात्र या चार वर्षांत मोदी सरकार कॉँग्रेसपेक्षाही अधिक निष्क्रिय आणि जाती-धर्माचे विष कालवणारे सरकार म्हणून लोकांपुढे आले. आगामी स्वातंत्र्यदिनानंतर मोदींची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी राहणार नाही, असा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा मेळाव्यात पुकारला.
‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने रविवारी (दि.२९) भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद यात्रेअंतर्गत जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आंबेडकरप्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष पवन पवार, खंडेराव पाटील, किशोर दमाळे, अ‍ॅड. विजय मोरे, बाजीराव तिडके, जावेद मुन्शी, अ‍ॅड. अरुण जाधव यांसह विविध बारा बलुतेदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी समाजबांधवांनी ‘बोलो-बोलो जय भीम’चा नारा बुलंद करत अवघे सभागृह दणाणून सोडले. यावेळी आंबेडकर म्हणाले, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाच्या पंतप्रधानांचे होणारे भाषण हे महत्त्वाचे असते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यातील अन् देशातील वातावरण अस्थिर करण्याचा आमचा हेतू नाही; मात्र स्वातंत्र्यदिनानंतर भाजपा सरकार आणि नरेंद्र मोदी यांची लक्तरे चव्हाट्यावर आणण्याची मोहीम हाती घेऊ.

मोदींनी या देशातील शेतकऱ्यांना हमीभाव वाढीचे दिलेले आश्वासन हे फसवे आहे; कारण या सरकारने अंदाजपत्रकात अन्नधान्य खरेदीसाठी तशी कुठलीही तरतूद केलेली नाही. जेव्हा या देशातील शेतक-यांना हे लक्षात येईल, की सरकारने रंगविलेले हमीभाववाढीचे स्वप्न भंगले आहे, तेव्हा केंद्राकडून लोकसभेची निवडणूक जाहीर केली जाईल, असे आंबेडकर यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये आपल्या मताचा योग्य वापर करून आश्वासनांची खैरात आणि विषमता पोसणारे मनुवादी व्यवस्थेला खतपाणी घालणारे सरकार उधळून लावण्याचे महत्त्वाचे कार्य बहुजनांना करायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: On the gates of government after Independence: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.