गंजमाळ, भद्रकालीतील धार्मिक स्थळे बंदोबस्तात हटविली ;  नागरिकांनी विरोध केल्याने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:31 AM2017-11-14T00:31:02+5:302017-11-14T00:33:28+5:30

संवेदनशील समजल्या जाणाºया भद्रकाली आणि गंजमाळ येथील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु यातून सामंजस्याने मार्ग काढीत अतिक्रमण काढण्यात आले. दिवसभरात १५ अतिक्रमणे हटविण्यात आली. दरम्यान, भद्रकाली मंदिराजवळील साक्षी गणेश मंदिराचे अतिक्रमण काढू नये, यासाठी माजी महापौर विनायक पांडे यांनी विभागीय अधिकाºयांना महापालिकेच्या ठरावाची फाइल दिली.

 Ganjmala, Bhadrakali's religious places were destroyed by compromise; Confusion by the citizens protest | गंजमाळ, भद्रकालीतील धार्मिक स्थळे बंदोबस्तात हटविली ;  नागरिकांनी विरोध केल्याने गोंधळ

गंजमाळ, भद्रकालीतील धार्मिक स्थळे बंदोबस्तात हटविली ;  नागरिकांनी विरोध केल्याने गोंधळ

Next
ठळक मुद्दे अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिकांनी विरोध शहरातील आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आलेसाक्षी गणेश मंदिराचे अतिक्रमण काढण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती


नाशिक : संवेदनशील समजल्या जाणाºया भद्रकाली आणि गंजमाळ येथील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु यातून सामंजस्याने मार्ग काढीत अतिक्रमण काढण्यात आले. दिवसभरात १५ अतिक्रमणे हटविण्यात आली. दरम्यान, भद्रकाली मंदिराजवळील साक्षी गणेश मंदिराचे अतिक्रमण काढू नये, यासाठी माजी महापौर विनायक पांडे यांनी विभागीय अधिकाºयांना महापालिकेच्या ठरावाची फाइल दिली.  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने गेल्या सहा दिवसांपासून शहर परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणारे धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ केला आहे. या मोहिमेत शहरातील आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले. सोमवारीदेखील भद्रकाली आणि गंजमाळ येथील धार्मिक स्थळे हटविण्यात आले. या मोहिमेसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. भद्रकाली येथील धार्मिक स्थळ हटविताना स्थानिक नागरिकांनी काहीसा विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यांची समजूत काढल्यानंतर अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली.
गंजमाळ येथील श्रमिकनगर येथे एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढताना स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध करीत अतिक्रमण काढू नये अशी मागणी केली, तर स्थळाच्या बाजूचे बांधकाम स्वत:हून काढून घेतले. पूर्ण धार्मिक स्थळ काढण्यासाठी नागरिकांनी भावनेचा मुद्दा उपस्थित करीत विधीवत धर्मगुरूंच्या अधिपत्त्याखाली धार्मिक विधीनंतरच स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले जाईल यासाठी त्यांनी मुदत मागितली. त्यानुसार पालिकेने त्यांना दोन दिवसांची मुदत दिली. मात्र महापालिकेच्या पथकाने धार्मिक स्थळाच्या मागील बाजूस असलेले वाढीव बांधकाम जमीनदोस्त केले. या बाजूलाच लागून असलेली दोन दुकानेही काढण्यात आली. दरम्यान, मंगळवारीही शहरात धार्मिक स्थळांविरुद्धची अतिक्रमण मोहीम सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कळविले आहे.
साक्षी गणेश मंदिर अतिक्रमण काढण्यास स्थगिती
भद्रकाली येथील साक्षी गणेश मंदिराचे अतिक्रमण काढण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने येथून अतिक्रमण विरोधी पथक परतले. सोमवारी साक्षी गणेश मंदिराचे अतिक्रमण काढणार असल्याची चर्चा झाल्याने मंदिराजवळ गर्दी झाली होती. महापालिकेनेच या मंदिराच्या सुशोभिकरणासाठी परवानगी दिल्याची बाब मंदिराच्या विश्वस्तांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने अतिक्रमण काढण्यास न्यायालयाने स्थगिती दिली.

Web Title:  Ganjmala, Bhadrakali's religious places were destroyed by compromise; Confusion by the citizens protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.