भूमिहिनांसाठी गायकवाड यांचे कार्य मोलाचे : लक्ष्मणराव ढोबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:13 AM2018-10-23T01:13:23+5:302018-10-23T01:13:51+5:30

भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी दिलेला लढा खूप मोठा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ैढोबळे यांनी केले.

 Gaikwad's work for Bhumishhinna is valuable: Laxmanrao Dhobale | भूमिहिनांसाठी गायकवाड यांचे कार्य मोलाचे : लक्ष्मणराव ढोबळे

भूमिहिनांसाठी गायकवाड यांचे कार्य मोलाचे : लक्ष्मणराव ढोबळे

Next

नाशिकरोड : भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी दिलेला लढा खूप मोठा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ैढोबळे यांनी केले.  कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त देवळालीगाव महात्मा गांधी सभागृहात आयोजित व्याख्यानात ढोबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि समानतेची संधी संविधानमध्ये दिल्याने आपल्याला शिक्षण घेऊन उच्चपदावर काम करण्याची संधी मिळाली. तसेच कायद्यामुळे सुरक्षितता प्राप्त झाली. बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यात कर्मवीर दादासाहेबांचे मोठे योगदान आहे. भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी दादासाहेबांनी दिलेल्या लढ्यामुळे शासनाने जमीन वाटप योजनेला दादासाहेब नाव दिले. दादासाहेबांनी अखेरपर्यंत दलितांच्या कल्याणासाठी लढले. दादासाहेबांनी खासदाराकीच्या काळात नाशिकच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे ढोबळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक सुनील वाघ होते. प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, संजय भालेराव, सुनील कांबळे, दिलीप दासवाणी, दिलीप आहिरे, शेखर भालेराव, समीर शेख, चंद्रकात भालेराव, रामबाबा पठारे, अमोल पगारे, राजाभाई वानखेडे, किशोर खडताळे, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन भारत निकम यांनी केले.  यावेळी सोनाली दोंदे, ज्योती आहिरे, भारती मोरे, मीना वाघ, सुभाष गोवर्धने, हेंमत चंद्रमोरे, प्रवीण बागुल, प्रकाश लांडे, नितीन चंद्रमोरे, विश्वनाथ भालेराव, अशोक रोहम, बाळासाहेब सोनवणे, अजीज शेख, अकाश भालेराव, विशाल घेगमल, कृष्णा शिंदे, आसाराम भदरंगे, मिलिंद जगताप, महेंद सोनवणे, सुभाष मुळे, गौतम दाणी, रवि गांगुर्डे, अर्जुन भालेराव आदी उपस्थित होते.

Web Title:  Gaikwad's work for Bhumishhinna is valuable: Laxmanrao Dhobale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक