पुरोहित संघातर्फे मोफत नेत्रतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:37 PM2019-03-19T23:37:34+5:302019-03-20T01:02:26+5:30

त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाच्या वतीने व नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर येथील तीर्थराज कुशावर्तशेजारील गंगा गोदावरी मंदिरात मंगळवारी मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Free eye check-up by the Purohit team | पुरोहित संघातर्फे मोफत नेत्रतपासणी

पुरोहित संघातर्फे मोफत नेत्रतपासणी

Next

त्र्यंबकेश्वर : येथील पुरोहित संघाच्या वतीने व नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वर येथील तीर्थराज कुशावर्तशेजारील गंगा गोदावरी मंदिरात मंगळवारी मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, तुलसी आय हॉस्पिटलचे नेत्र चिकित्सक डॉ. राधारमण शौचे, डॉ. प्रतीक बकरे, डॉ. रोहित श्रीवास्तव आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून शिबिराची सुरु वात करण्यात आली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन हर्षल शिखरे यांनी केले. मंगळवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत साडेतीनशे नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिर यशस्वतीतेसाठी डॉ. अनिल उपासनी, डॉ. माणिकलाल नागोरी, पुरोहित संघाचे पदाधिकारी मनोज थेटे, अनंतराव जोशी, गिरीश जोशी, मिलिंद धारणे, नीरज शिखरे, सदानंद टोके, गिरीश लोहगावकर आदींसह पुरोहित संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Free eye check-up by the Purohit team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.