सिन्नर-शिर्डी रस्त्यावर अपघातात चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 01:26 AM2019-01-26T01:26:22+5:302019-01-26T01:26:44+5:30

सिन्नर-शिर्डी महामार्गावर शुक्रवारी (दि.२५) रात्री निमआराम बस व कार यांच्यात समोरासमोर अपघात होऊन कारमधील चारजण जागीच ठार झाले. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. मृतात सौरभ अशोक थोरात, आकाश संजय पाटोळे, पंकज सुरेश वाळुंज यांचा समावेश आहे.

 Four killed in road accident on Sinnar-Shirdi road | सिन्नर-शिर्डी रस्त्यावर अपघातात चार ठार

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर अपघातात चार ठार

Next

सिन्नर/पांगरी : सिन्नर-शिर्डी महामार्गावर शुक्रवारी (दि.२५) रात्री निमआराम बस व कार यांच्यात समोरासमोर अपघात होऊन कारमधील चारजण जागीच ठार झाले. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. मृतात सौरभ अशोक थोरात, आकाश संजय पाटोळे, पंकज सुरेश वाळुंज यांचा समावेश आहे. अपघातानंतर तीनजण कारमध्येच असल्याने कारचे पत्रे तोडून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. पांगरी व देवपूर फाट्याच्या दरम्यान वळणावर रात्री ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.  दादर-शिर्डी बस (क्र. एमएच २० बी एल ३१९१) व वावीकडून सिन्नरकडे जाणारी आय ट्वेन्टी कार (एमएच १७ बी एस ७४६)
यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण  होता की, यात कारचा चक्काचूर झाला.
अपघाताची खबर मिळताच वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव देऊन मदतकार्य सुरू केले. अपघातानंतर कारमध्ये चारजण अडकून पडले होते. कारचे पत्रे तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Web Title:  Four killed in road accident on Sinnar-Shirdi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.