नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूने चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:27 AM2018-09-20T01:27:41+5:302018-09-20T01:28:10+5:30

शहर आणि परिसरात स्वाइन फ्लूचा विळखा कायम आहे. शहरासह जिल्ह्यात थैमान घातलेल्या स्वाइन फ्लूने बुधवारी चौघांचा बळी घेतला. त्यात महिलेचा समावेश आहे.

 Four die of swine flu in Nashik district | नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूने चौघांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूने चौघांचा मृत्यू

Next

नाशिक : शहर आणि परिसरात स्वाइन फ्लूचा विळखा कायम आहे. शहरासह जिल्ह्यात थैमान घातलेल्या स्वाइन फ्लूने बुधवारी चौघांचा बळी घेतला. त्यात महिलेचा समावेश आहे.  चांदवड तालुक्यातील सोनीसांगवी येथील भीवराज केदू ठाकरे (४०) व निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील रवींद्र धर्माजी गरुड असे मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे आहेत़ ठाकरे यांना सोमवारी (दि़ १७) स्वाइन फ्लू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्यांचा बुधवारी (दि़ १९) पहाटे मृत्यू झाला असून, त्यांचा तपासणी अहवाल अद्याप पुणे येथून आलेला नाही़ रवींद्र गरुड यांना  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात  आले होते़ त्यांचाही बुधवारी (दि़ १९) सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़
येवला तालुक्यात महिलेचा मृत्यू
येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील ताराबाई शरद कानडे (४२) या महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. या महिलेला पाटोदा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लासलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती बिघडल्याने नाशिकला हलविण्यात येत असताना या महिलेने अंतिम श्वास घेतला. (पान ७ वर)
आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी विशेष समितीची स्थापना केली असून, त्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील एक प्रतिनिधी, बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, आरोग्य उपसंचालकांकडील प्रतिनिधी, जिल्हा शल्यचिकित्सक व फिजिशियन यांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या रुग्णास स्वाइन फ्लू झाला असला तरी त्याचा मृत्यू त्यानेच झाला की हृदयविकार वा इतर आजाराने झाला याचा शोध ही समिती घेणार आहे़

Web Title:  Four die of swine flu in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.