माजी मंत्री घोलप यांना सव्वा लाखाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:03 AM2018-03-06T02:03:58+5:302018-03-06T02:03:58+5:30

नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांची विविध आमिषापोटी फसवणूक होण्याचे प्रकार शहरात सर्रास होत असतात; मात्र आता चक्क राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांना तब्बल एक लाख ३३ हजार रुपयांना गंडा घातला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 Former minister Gholap is a very self-confident person | माजी मंत्री घोलप यांना सव्वा लाखाला गंडा

माजी मंत्री घोलप यांना सव्वा लाखाला गंडा

googlenewsNext

नाशिक : नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांची विविध आमिषापोटी फसवणूक होण्याचे प्रकार शहरात सर्रास होत असतात; मात्र आता चक्क राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांना तब्बल एक लाख ३३ हजार रुपयांना गंडा घातला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवळालीगाव परिसरात वास्तव्यास असलेले घोलप यांनी भ्रमणध्वनी क्रमांकावर आलेला लघुसंदेश वाचून संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी भामट्याने व्हीआयपी सीमकार्डबाबत माहिती देत त्यांचा विश्वास संपादन केला. ८४४४४४४४४४ या व्हीआयपी क्रमांकाची भुरळ घोलप यांना घालून त्याने वेळोवेळी पैसे उकळले. व्हीआयपी क्रमांक खरेदी केल्यास आयफोन मोफत देण्याचे आमिषही घोलपांना दाखविले गेले. घोलप यांनी सुरुवातीला ५० हजार रुपये भरले; मात्र टप्प्याटप्याने त्यांच्याकडून तब्बल एक लाख ३३ हजार रुपये नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आले; मात्र त्यानंतर संपूर्ण पैसे भरूनही कुठल्याही प्रकारे वस्तू व सेवा पुरविली नसल्याचे लक्षात आल्यानंतर भामट्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला.
नोव्हेंबरमध्ये फसवणूक
१ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत वेळोवेळी भारतीय एअरटेल एंटरप्रायजेस तलवाररोड शाखा, जयपूर, संतोष राठोड कोटक महिंद्र शाखा जयपूर या नावाने असलेल्या बॅँक खात्यामध्ये घोलप यांनी रक्कम जमा केली. सुरुवातीला तीस हजार रुपये एंटरप्रायजेस खात्यावर त्यांनी जमा केले त्यानंतर राठोड नावाच्या भामट्याच्या खात्यावर घोलप यांनी दोन वेळा व्यवहार करत ५४ हजार व २९ हजार १२६ रुपये जमा केल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, घोलप यांनी रविवारी (दि.४) नाशिकरोड पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज दिला असून, त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
भ्रमणध्वनी क्रमांक स्विच आॅफ
घोलप यांना ज्या क्रमांकावरून लघुसंदेश धाडला गेला व वेळोवेळी त्यांच्यासोबत मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. अशी सर्व भ्रमणध्वनी क्रमांकाची यादी घोलप यांनी तक्रार अर्जात नमूद केली आहे; मात्र यापैकी एकही भ्रमणध्वनी क्रमांक सुरू नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्णात संशयित भामट्यांनी जरी मोबाइलचा वापर करत फसवणूक केली असली तरी नाशिकरोड पोलीस ठाण्यात केवळ फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल असून, सायबर गुन्ह्णाची कुठलेही कलम नोंदविण्यात आलेले नाही हे विशेष !

Web Title:  Former minister Gholap is a very self-confident person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक