रेल्वे कारखान्यात अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:30 PM2018-05-12T13:30:14+5:302018-05-12T13:30:14+5:30

मनमाड: कच्च्या मालाची पुर्तता करण्यात यावी, अत्याधुनीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी येथील रेल्वेच्या केंद्रीय इंजिनियरींग कारखान्यात आॅल इंडीया एस सी एसटी असोशिएशनने केलेल्या अवाहनाला प्रतिसाद देत सर्व कामगार संघटनांनी आज अन्नत्याग आंदोलन केले. कामावर आणलेले जेवनाचे डबे समोर ठेउन धरणे आंदोलन करण्यात आले.

Food Stop movement in the railway factory | रेल्वे कारखान्यात अन्नत्याग आंदोलन

रेल्वे कारखान्यात अन्नत्याग आंदोलन

Next

मनमाड: कच्च्या मालाची पुर्तता करण्यात यावी, अत्याधुनीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी येथील रेल्वेच्या केंद्रीय इंजिनियरींग कारखान्यात आॅल इंडीया एस सी एसटी असोशिएशनने केलेल्या अवाहनाला प्रतिसाद देत सर्व कामगार संघटनांनी आज अन्नत्याग आंदोलन केले. कामावर आणलेले जेवनाचे डबे समोर ठेउन धरणे आंदोलन करण्यात आले. देशातील महत्वाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड येथील रेल्वे कारखान्याला गेल्या काही दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. २०१८-१९ सालातील स्टील पुरवठा करार रेल्वे बोर्ड स्तरावर पुर्ण करण्यात यावा. कच्च्या मालाची वेळेवर पुर्तता करण्यात यावी, कारखान्याच्या आधुनीकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा,जीएसएस विभागाला पुरेसा वर्कलोढ देण्यात यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनाला देण्यात आले.सर्व कामगारांनी अन्नत्याग आंदोलन करून रेल्वे प्रशसनाचे या मागण्यांकडे लक्ष वेधले. मुख्य कारखाना प्रबंधक ए.के. तिवारी यांनी या मागण्यांबाबद प्रशासनाकडे पाठपुरवा करणार असल्याचे अश्वासन कामगारांना दिले. या वेळी एससी एसटी असोशिएशनचे झोनल सचिव सतीश केदारे कारखाना शाखा सचिव सिध्दार्थ जोगदंड,सीआरएमएस अध्यक्ष प्रकाश बोडके,नितनी पवार, महेंद्र चोथमल,एनआरएमयू चे किरण कातकाडे,संजय दिक्षीत , राजेंद्र बोडके,रेल्वे कामगार सेनेचे संजय बोडके,संतोष पाटील ,संतोष सोनवणे,सचिन इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे प्रविण अहिरे, किरण अहिरे,हर्षल सुर्यवंशी,सुनिल सोनवणे , विनोद झोडपे यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Food Stop movement in the railway factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक