इंदिरानगरात मोकाट श्वानाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:27 AM2019-04-09T01:27:21+5:302019-04-09T01:27:39+5:30

राजीव टाउनशिप परिसरात सायंकाळच्या सुमारास मोकाट श्वानाने धुमाकूूळ घालत चार ते पाच जणांना चावा घेतल्याने परिसरात एकच धावपळ उडाली.

The fog of the cockpit in Indirangar | इंदिरानगरात मोकाट श्वानाचा धुमाकूळ

इंदिरानगरात मोकाट श्वानाचा धुमाकूळ

Next

इंदिरानगर : राजीव टाउनशिप परिसरात सायंकाळच्या सुमारास मोकाट श्वानाने धुमाकूूळ घालत चार ते पाच जणांना चावा घेतल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. परिसरातून सैरावैरा धावणाऱ्या या श्वानाने रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांबरोबरच खेळणाºया काही मुलांनाही चावा घेतला. या श्वानाला पकडण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करूनही श्वान हाती लागला नाही.
इंदिरानगर परिसरात मोकाट श्वानांचा उपद्रव ही चिंतेची बाब असून, अनेकदा त्यांनी नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सोमवारी सायंकाळी पुन्हा असाच प्रकार घडला. राजीव टाउनशिप परिसरात मोकाट श्वानाने चार ते पाच जणांना चावा घेतल्याने एकच गोंधळ उडाला. श्वान सैरावैरा धावत कुणाच्याही अंगावर जाऊ लागल्याने स्थानिक नागरिक रस्त्याने ये-जा करणाºयांची देखील भंबेरी उडाली. श्वान पिसाळल्याने तर अधिकच धावपळ झाली.
कचरा डेपोमुळे वाढली संख्या
इंदिरानगरपासून जवळच कचरा डेपो असून, या कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणात मोकाट श्वानांचा संचार असतो. हे श्वान जवळपासच्या परिसरातदेखील आल्याने इंदिरानगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट श्वानांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे.

Web Title: The fog of the cockpit in Indirangar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.