शहरातून पाच दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:06 AM2019-06-22T00:06:22+5:302019-06-22T00:07:17+5:30

गेल्या आठवड्यात चोरीच्या दुचारीकवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी मुथूट फायनान्स लुटण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार ताजाच असताना नाशिक शहर व परिसरातून आणखी पाच दुचाकींची चोरी झाली आहे.

 Five motorbike stolen from the city | शहरातून पाच दुचाकींची चोरी

शहरातून पाच दुचाकींची चोरी

Next

नाशिक : गेल्या आठवड्यात चोरीच्या दुचारीकवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी मुथूट फायनान्स लुटण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार ताजाच असताना नाशिक शहर व परिसरातून आणखी पाच दुचाकींची चोरी झाली आहे. अशा चोरीच्या वाहनांचा वापर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये होत असल्याचे यापूर्वी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये समोर आलेले असताना शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, वाहन चोरट्यांवर नियंत्रण मिळविण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांत अंबड, रविवार कारंजा आणि देवळाली कॅम्प परिसरातून पाच दुचाकी वाहनांची चोरी झाल्याची घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहेत. सातपूर-अंबड लिंकरोडवरील जयेश पार्क येथील राहुल दोंदे यांच्या घरासमोरील ओट्यावर पार्किंग केलेली एम १५ इक्यू ७८१० ही ५० हजार रुपये किमतीची काळ्याची रंगाची दूचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक शेळके या प्रकरणाता तपास करीत आहेत, तर सिडकोतील उत्तमनगर येथील महात्मा फुले चौकातील जगनसिंह झाला यांची एमएच १९ बीआर ५८०२ क्रमांकांची काळ्या रंगाची दुचाकी अज्ञातांनी चोरली असून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार खांडेकर या चोरीचा तपास करीत आहेत. तिसरी घटना सातपूर-अंबड लिंक रोडवरील संजीवनगर, जाणता राजा चौक येथे घडली आहे. येथील आकाश प्रभाकर गिलबिले यांची घरासमोरील पार्किंग केलेली एमएच१५ डीटी ०६८६ काळ्या रंगाची ५० हजार किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या चोरीप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शेळके तपास करीत आहेत, तर चौथी दुचाकी रविवार कारंजा येथील तेली गल्लीतील गोदावरी संकुल येथून चोरीला गेली आहे. तेल्लीगल्लीतील शेखल नाळेगावकर यांची दुचाकी क्रमांक एमएच १५ बीएल ८४९६ क्रमाकांची काळ्या रंगाची हिरो होंडो स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक डी. के. गुंजाळ या चोरीचा तपास करीत आहे. पाचव्या दुचाकीची चोरी देवळाली कॅम्प येथील बार्न्स स्कूल साउथरोड येथून झाली आहे. या ठिकाणाहून ज्ञानेश्वर पाळदे (३०) यांची एमएच १५ इआर २९७४ क्रमांकाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञान चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वाढत्या दुचाकींच्या चोरीला पोलिसांची निष्क्रियता जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच उरला नसल्याने मोकाट सुटलेल्या चोरट्यांकडून अशाप्र्रकारे दुचाकीचोरी, घरफोडीसारखे गुन्हे सºहास सुरू असल्याची टीका पोलिसांनीवर होऊ लागली आहे.

Web Title:  Five motorbike stolen from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.