किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतक-यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 05:18 PM2019-02-18T17:18:12+5:302019-02-18T17:18:43+5:30

अर्जासाठी गर्दी : झेरॉक्स व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’

Farmers' runway for the benefit of Kisan Samman Yojana | किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतक-यांची धावपळ

किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी शेतक-यांची धावपळ

Next
ठळक मुद्देकिसान सन्मान अर्जाचे शुल्क २ रु पये असतांना तो अर्ज दुकानदारांकडून १० रु पयांना विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत.

पिंपळगाव बसवंत : केंद्र शासनाने अल्पभूधारक शेतक-यांना वर्षाकाठी सहा हजार रु पये थेट अनुदानाची घोषणा केल्याने या योजनेंतर्गत मिळणा-या लाभासाठी शेतक-यांची गाव पातळीवर धावपळ सुरू झाली आहे. परिणामी, जिल्हाभरातील तलाठ्यांकडे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अल्पभूधारक शेतक-यांची अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी होत आहे. दरम्यान, आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करून त्यांच्या झेरॉक्स प्रती तलाठी तसेच ग्रामपंचायत कार्यालयात द्याव्या लागत असल्याने ग्रामीण भागातील झेरॉक्स व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र दिसून येत आहे.
या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात अल्पभूधारक शेतक-यांना एकूण सहा हजार रु पये थेट अनुदान खात्यावर वर्ग होणार आहे. पहिल्या टप्प्यात एप्रिलमध्ये दोन हजार रु पये खात्यावर वर्ग करण्याची तयारी शासनाकडून सुरू असून महसूल विभागाने गावपातळीवर लाभार्थी प्राप्त शेतक-यांचे अर्ज घेणे सुरू केले आहे. आधार कार्ड, जिल्हा बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेचा खाते स्टेटमेंट, शेती गट नंबर, सर्वे नंबर, २ हेक्टर क्षेत्र असल्याचा उतारा आदी कागदपत्रे विशिष्ट नमुन्यात भरून तलाठ्याकडे देण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरू आहे. या प्रक्रि येत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची समिती काम करीत आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी झेरॉक्सच्या दुकानांत उपलब्ध असलेल्या किसान सन्मान अर्जाचे शुल्क २ रु पये असतांना तो अर्ज दुकानदारांकडून १० रु पयांना विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर सातबारा मिळवण्यासाठी देखील शेतक-यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
कागदपत्रांसाठी आर्थिक झळ
पिंपळगाव बसवंत येथील तलाठी कायमस्वरूपी नसल्यामुळे सातबारा साठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून नोंदी मिळवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी येण्या-जाण्याचा खर्च तसेच झेरॉक्सचा खर्च असा एकूण २०० ते ३०० रु पये खर्च सध्या शेतक-याला करावा लागत आहे.

Web Title: Farmers' runway for the benefit of Kisan Samman Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक