नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात पुन्हा निष्काळजीपणाचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:51 PM2017-12-28T14:51:53+5:302017-12-28T14:53:12+5:30

महिलेच्या प्रसूतीकडे ड्यूटीवरील डॉक्टरांसह कर्मचाºयांकडून दुर्लक्ष झाल्याचा प्रकार

Experiencing the negligence of the Indira Gandhi hospital in Nashik | नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात पुन्हा निष्काळजीपणाचा अनुभव

नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात पुन्हा निष्काळजीपणाचा अनुभव

Next
ठळक मुद्देप्रसूतीकडे दुर्लक्ष : वैद्यकीय विभागाकडून तातडीने चौकशी


नाशिक : पंचवटीतील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात मागील सप्ताहात निष्काळजीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.२७) पुन्हा एकदा एका महिलेच्या प्रसूतीकडे ड्यूटीवरील डॉक्टरांसह कर्मचाºयांकडून दुर्लक्ष झाल्याचा प्रकार घडला. सदर महिलेच्या नातेवाइकाने ओरड केल्यानंतर वैद्यकीय विभागाने या प्रकाराची तत्काळ चौकशी केली आणि निष्काळजीपणा झाल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगण्यात आले.
पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. सदर महिलेच्या पोटात कळा येत असल्याने तिच्यासोबत आलेल्या महिला नातेवाइकाने तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना महिलेची तपासणी करण्याची मागणी केली परंतु, ड्यूटीवर असलेली परिचारिका बघेल, असे सांगत डॉक्टरने दाद दिली नाही, तर परिचारिकेनेही आॅन कॉल डॉक्टर आल्याशिवाय हात लावणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे महिलेला प्रसूतीवेळी त्रास झाल्याचा आरोप सदर महिलेच्या नातेवाइकाने केला. यावेळी सदर नातेवाइकाने रुग्णालयात आरडाओरड करत गोंधळही घातला. दरम्यान, महिलेची प्रसूती होऊन जन्माला आलेल्या बाळाची स्थिती पाहून त्याला बिटको रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या साºया घटनेची वाच्यता होताच माध्यमांमध्येही त्याची खबर पोहोचली. त्यानंतर, वैद्यकीय विभागाचे अधिक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी तातडीने संबंधित डॉक्टरांसह परिचारिकांना कार्यालयात पाचारण करत चौकशी केली. परंतु, सदर महिलेच्या प्रसूतीकडे दुर्लक्ष झाले नसल्याचा खुलासा वैद्यकीय विभागाकडून करण्यात आला. मात्र, कर्मचाºयांकडून रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना चांगली वागणूक मिळाली नसेल, याची शक्यताही बोलून दाखविण्यात आली.

Web Title: Experiencing the negligence of the Indira Gandhi hospital in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.