रेल्वे रुळाला तडे गेल्याने वेळापत्रक कोलमडले आसनगाव येथील घटना : गाड्यांना विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:45 AM2017-12-20T01:45:01+5:302017-12-20T01:45:27+5:30

कसारा-कल्याण दरम्यान आसनगाव येथे मंगळवारी सकाळी मुंबईकडून येणाºया (डाउन) रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आल्याने भागलपूर व पुष्पक एक्स्प्रेस एक ते दीड तास थांबविण्यात आली होती.

Events in Asangaon triggered by crackdown on rail tracks: Delay in trains | रेल्वे रुळाला तडे गेल्याने वेळापत्रक कोलमडले आसनगाव येथील घटना : गाड्यांना विलंब

रेल्वे रुळाला तडे गेल्याने वेळापत्रक कोलमडले आसनगाव येथील घटना : गाड्यांना विलंब

googlenewsNext

नाशिकरोड : कसारा-कल्याण दरम्यान आसनगाव येथे मंगळवारी सकाळी मुंबईकडून येणाºया (डाउन) रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आल्याने भागलपूर व पुष्पक एक्स्प्रेस एक ते दीड तास थांबविण्यात आली होती. रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही रेल्वे पुढे मार्गस्थ झाल्या.
कसारा-कल्याण दरम्यानच्या टिटवाळाजवळील आसनगाव येथे मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंबईकडून येणाºया (डाऊन) रेल्वे मार्गाच्या रुळाला तडे गेल्याचे लक्षात आले. यामुळे एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेस व एलटीटी-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस आसनगाव येण्याअगोदरच थांबविण्यात आल्या होत्या. त्यानंतर युद्धपातळीवर रेल्वे प्रशासनाकडून एक तासात तडे गेलेल्या रेल्वे रुळाचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर १ तास १० मिनिटे उशिराने भागलपूर एक्स्प्रेस व दीड तास उशिराने पुष्पक एक्स्प्रेस पुढे मार्गस्थ झाली.
धुक्यामुळे रेल्वे उशिरा
उत्तर भारतात वाढलेली थंडी व धुक्यामुळे मंगळवारी सकाळी भुवनेश्वर-एलटीटी एक्स्प्रेस, गरीबरथ, महानगरी, बनारस एक्स्प्रेस या रेल्वे चार ते पाच तास उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

Web Title: Events in Asangaon triggered by crackdown on rail tracks: Delay in trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.