पर्यावरणाचा संदेश देणारी लग्नपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:40 AM2018-05-11T01:40:01+5:302018-05-11T01:40:01+5:30

आडगाव : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असला तरी त्या काळात कुटुंबाची मोठी धावपळ असते. त्यामधील महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे लग्नपत्रिकेचा.

Environmental Magazine | पर्यावरणाचा संदेश देणारी लग्नपत्रिका

पर्यावरणाचा संदेश देणारी लग्नपत्रिका

googlenewsNext
ठळक मुद्देसामाजिक संदेश देणारी लग्नपत्रिका आडगाव परिसराचे आकर्षणस्वच्छ भारत अभियानाचा महात्मा गांधी यांचा चष्मा

आडगाव : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असला तरी त्या काळात कुटुंबाची मोठी धावपळ असते. त्यामधील महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे लग्नपत्रिकेचा. आडगाव परिसरातील मेडिकल कॉलेजजवळ वास्तव्यास असलेल्या सुदाम दुशिंग यांचा १२ मे रोजी शुभविवाह आहे. त्यांची सामाजिक संदेश देणारी लग्नपत्रिका आडगाव परिसराचे आकर्षण ठरत आहे. या विवाहसोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा अतिशय कल्पक असा प्रयत्न केला आहे. लग्नपत्रिका म्हटली की साधारणत: नातेवाइकांची भरमसाठ नावे असतात; पण नेहमीच्याच या पद्धतीला बगल देत कमी खर्चात पर्यावरणाचा संदेश देणारी लग्नपत्रिका तयार करून एक सामाजिक आदर्श दुशिंग परिवाराने समाजासमोर ठेवला आहे.
लग्नपत्रिकेमधील जागेचा वापर विविध सामाजिक समस्यांबाबत जागृती करण्यासाठी करण्यात आला आहे. यात सर्वप्रथम श्री गणेश यांना वंदन करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे संकेतचिन्ह, स्वच्छ भारत अभियानाचा महात्मा गांधी यांचा चष्मा असून, त्या चष्म्यामध्ये वर-वधूचे नाव देण्यात आले आहे. यात स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. विवाह मुहूर्त, विवाहस्थळ हे दर्शविताना हिरवळीचा वापर करण्यात आला असून, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’ या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी टाकण्यात आल्या आहेत. याद्वारे झाडे लावा, झाडे जगवा, हिरवळीद्वारे मानवाचे कल्याण होईल तसेच पर्यावरण रक्षण, प्रदूषण टाळण्याचा संदेश देण्यात आला
आहे. यासोबत रक्तदान, बेटी बचाओ, बेटी पढाओ, पाण्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याबरोबर शेतीसाठी सूक्ष्म सिंचन करावे, पर्यावरण वाचवा असा संदेश देण्याबरोबर मतदान आपला हक्क व कर्तव्य आहे असे महत्त्वपूर्ण ऐरणीचे मुद्दे असलेल्या सामाजिक विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

Web Title: Environmental Magazine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.