विजेचा तुटवडा, भारनियमनाचा ‘झटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:46 AM2017-09-13T00:46:40+5:302017-09-13T00:46:40+5:30

विजेचा तुटवडा, भारनियमनाचा ‘झटका’ नाशिक : वीजनिर्मितीचा तुटवडा झाल्यामुळे महावितरणक डून अचानकपणे मंगळवारी (दि.१२) संपूर्ण राज्यभरात तात्पुरत्या स्वरूपात भारनियमन करण्यात आले. याअंतर्गत शहरामधील विविध भागांमध्ये दुपारी-संध्याकाळी ‘बत्ती गुल’ झाली होती. शहराचे वातावरणात उष्मा वाढलेला असताना झालेल्या भारनियमनामुळे नागरिकांना त्याचा अधिक प्रभाव जाणवला.

 Electric scarcity, weight loss 'jerk' | विजेचा तुटवडा, भारनियमनाचा ‘झटका’

विजेचा तुटवडा, भारनियमनाचा ‘झटका’

googlenewsNext

विजेचा तुटवडा, भारनियमनाचा ‘झटका’

नाशिक : वीजनिर्मितीचा तुटवडा झाल्यामुळे महावितरणक डून अचानकपणे मंगळवारी (दि.१२) संपूर्ण राज्यभरात तात्पुरत्या स्वरूपात भारनियमन करण्यात आले. याअंतर्गत शहरामधील विविध भागांमध्ये दुपारी-संध्याकाळी ‘बत्ती गुल’ झाली होती. शहराचे वातावरणात उष्मा वाढलेला असताना झालेल्या भारनियमनामुळे नागरिकांना त्याचा अधिक प्रभाव जाणवला.
राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धता व पुरवठ्यामध्ये आलेल्या अडचणींमुळे वीजनिर्मितीचा तुटवडा निर्माण झाल्याचे महावितरणकडून भारनियमनामागील कारण सांगण्यात आले. या कारणास्तव संपूर्ण राज्यात मंगळवारी भारनियमन दुपारी तीन तास व संध्याकाळी तीन तास या वेळेनुसार करण्यात आले. सदरचे भारनियमन कमी वसुली व जास्त वीजहानी असलेल्या ई-एफ-जी गटांमधील वीजवाहिन्यांवर गरजेनुसार केले गेले.
शहरातील इंदिरानगर, पाथर्डी, वडाळागाव, अशोका मार्ग, साईनाथनगर, उपनगर, गांधीनगर या भागांत भारनियमन सकाळी साडेनऊ ते साडेबारा आणि दुपारी साडेतीन ते साडेसहा या वेळेत भारनियमन करण्यात आले.
शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. मध्यंतरी कडक ऊन पडत असतानाच आता पुन्हा पावसाची हजेरी होऊ लागल्याने वातावरणात उष्णता जाणवत आहे. अशा स्थितीत भारनियमन अडचणीचे ठरणार आहे.शहरातील भारनियमन परिसर शहर विभाग १ मधील कालिका माता मंदिर, गडकरी चौक, रविवार कारंजा, प्रकाश पेट्रोल पंप, गंजमाळ, एनडी पटेल रोड, लेखा नगर, ठक्कर बाजार, गोविंद नगर, मोरे वाडी, पंचवटीतील कृष्णा नगर, कला नगर, सारडा सर्कल, जुने नाशिक, फाळके रोड, भद्रकाली, दहीपुल परिसर व शहर विभाग २ मधील इंदिरानगर, कल्पतरू नगर, चुंचाळे घरकुल, सावरगांव, एकता नगर, नाशिकरोड गोरेवाडी, जाधव संकुल, मखमलाबाद, अश्वमेध नगर, पाथर्डी, सातपुर, दिपाली नगर, जेलरोड पंचक, हनुमान नगर, शिवाजी वाडी या भागामध्ये मंगळवारपासून आपत्कालीन व तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. वीज निर्मिती सुरळीत होईपर्यंत भारनियमन केले जाणार आहे.

Web Title:  Electric scarcity, weight loss 'jerk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.