आठ सदस्यांना सक्तीची निवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:00 AM2018-01-24T00:00:45+5:302018-01-24T00:18:15+5:30

महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार चिठ्ठी पद्धतीने फेब्रुवारीअखेर निवृत्त होणार असून, उर्वरित शिल्लक आठ सदस्यांनाही त्यांच्या पक्षामार्फत राजीनामे घेऊन सक्तीने निवृत्त केले जाणार आहेत. चालू पंचवार्षिक काळात दुसºया वर्षी स्थायी समितीवर जाण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. अधिकाधिक सदस्यांना स्थायीवर जाण्याची संधी मिळावी, यासाठी सर्वच पक्षांमार्फत सदस्यांचा कालावधी एक वर्षाचाच करण्यात येणार आहे.

 Eight member forced retirement | आठ सदस्यांना सक्तीची निवृत्ती

आठ सदस्यांना सक्तीची निवृत्ती

Next

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार चिठ्ठी पद्धतीने फेब्रुवारीअखेर निवृत्त होणार असून, उर्वरित शिल्लक आठ सदस्यांनाही त्यांच्या पक्षामार्फत राजीनामे घेऊन सक्तीने निवृत्त केले जाणार आहेत. चालू पंचवार्षिक काळात दुसºया वर्षी स्थायी समितीवर जाण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. अधिकाधिक सदस्यांना स्थायीवर जाण्याची संधी मिळावी, यासाठी सर्वच पक्षांमार्फत सदस्यांचा कालावधी एक वर्षाचाच करण्यात येणार आहे.  फेबु्रवारी २०१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन सर्वाधिक ६६ जागा जिंकत भाजपाने सत्ता संपादित केली. त्यानंतर १५ मार्चला महापौर-उपमहापौरपदाची तर ३० मार्चला स्थायी समितीवर तौलनिक संख्याबळानुसार १६ सदस्यांची निवड करण्यात आली होती. त्यात भाजपाकडून जगदीश पाटील, सुनीता पिंगळे, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, विशाल संगमनेरे, डॉ. सीमा ताजणे, अलका अहिरे, मुकेश शहाणे व श्याम बडोदे, शिवसेनेकडून सूर्यकांत लवटे, दत्तात्रेय सूर्यवंशी, प्रवीण तिदमे व भागवत आरोटे, कॉँग्रेसकडून वत्सला खैरे, राष्टÑवादीकडून राजेंद्र महाले तर मनसेच्या कोट्यातून अपक्ष मुशीर सय्यद यांची वर्णी लागली होती. दरम्यान, ७ एप्रिल रोजी स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवड होऊन प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे विद्यमान कार्यकारिणीला १० महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. नियमानुसार, २८ फेबु्रवारीपर्यंत विद्यमान स्थायी समितीची मुदत आहे. त्यापूर्वी, स्थायी समितीवरील ८ सदस्य चिठ्ठी पद्धतीने निवृत्त केले जाणार आहेत. तर नियमानुसार उर्वरित आठ सदस्यांना एक वर्षाचा कालावधी आणखी मिळू शकतो. परंतु, अधिकाधिक नगरसेवकांना स्थायी समितीवर जाण्याची संधी मिळावी यासाठी समितीवरील सदस्यांचा कालावधी एक वर्षाचाच ठेवण्याचा विचार सर्वच पक्षांमध्ये सुरू आहे. सत्ताधारी भाजपाने तर यापूर्वीच एक वर्षापुरताच कालावधी निश्चित केलेला आहे तर मागील पंचवार्षिक काळानुसार शिवसेना, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि मनसे या पक्षांकडूनही एक वर्षापुरतीच सदस्यांना संधी दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत.  स्थायीवर जाण्यासाठी शिवसेनेत सर्वाधिक चुरस दिसून येणार आहे. नियमानुसार, आठ सदस्य निवृत्त होतील तर उर्वरित आठ सदस्यांकडून राजीनामे स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे स्थायी समितीवर सर्वच्या सर्व १६ सदस्य नवीन चेहरे असणार आहेत. स्थायीवर जाण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असल्याने आतापासूनच इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

Web Title:  Eight member forced retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.