राहुड घाटात विचित्र अपघातात आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 01:42 AM2018-08-05T01:42:05+5:302018-08-05T01:42:17+5:30

चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन एक कंटेनर घाटाच्या खोल दरीत कोसळला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने त्याने तीनही वाहनाना धडक दिल्याने हा अपघात झाला.

Eight injured in strange accident in road accident | राहुड घाटात विचित्र अपघातात आठ जखमी

राहुड घाटात विचित्र अपघातात आठ जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देतीनही वाहनाना धडक दिल्याने हा अपघात

चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन एक कंटेनर घाटाच्या खोल दरीत कोसळला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने त्याने तीनही वाहनाना धडक दिल्याने हा अपघात झाला.
घटनास्थळी चांदवड पोलीस, सोमा कंपनीचे कर्मचारी, १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर पथक व कर्मचाऱ्यांनी मदत केली. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. कंटेनरचे (क्र. डीडी ०३ एच ९३५०) सायंकाळी सात ते सव्वासात वाजेच्या सुमारास राहुड घाटात ब्रेकफेल झाले. त्याने प्रारंभी मालेगावकडे जाणाºया कारला (क्र. एमएच २० ईवाय ०६४३) धडक दिली. त्यानंतरे स्वीफ्ट कारला (क्र. एमएच ०२/६१४८) धडक देऊन पिकअपला (क्र. एमएच ४१ एजी१३३७) धडक दिली. याचवेळी मालेगावकडे जाणाºया मोटारसायकलला धडक दिली. मात्र दुचाकीचालकाने प्रसंगावधान राखत गाडीचा ताबा सोडला नाही. दुचाकीचालक घटनास्थळावरून निघुन गेला. धडक देत देत कंटेनर खोल दरीत कोसळला. यात कंटेनरचालक ओमप्रकाश मौर्र्य (३५, रा. मिर्झापूर) तर क्लीनर लवकुश कुमार मौर्य (१७ रा. मिर्झापूर यू.पी.) हे दोघे गंभीर जखमी झाले. तर कारमधील सोनाली श्रीराम पाटील (४२), गायत्री स्वप्नील पाटील (२०), तृप्ती गौरव पाटील (३२), स्वप्नील श्रीराम पाटील (२६), गौरव राजेंद्र पाटील (२७, सर्व रा. चाळीसगाव) हे जखमी झाले. पिकअपचालक रोहिदास धोंडू नवगिरे (३४, रा.मालेगाव) जखमी झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
स्वीफ्ट मधील सर्व प्रवासी मालेगाव येथे नेण्यात आल्याने त्यांची नावे समजु शकली नाही.घटनेचे वृत्त समजताच सोमा कंपनीचे ग्रस्तीपथक,चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामचंद्र जगताप, चंद्रकांत निकम, बी.ए.सुर्यवंशी,देशमुख, मंगेश डोंगरे, जगताप, संसारे,वाळेकर यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले तर १०८रुग्णवाहीकेच्या सहाय्याने जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे शहरातील खाजगी व शासकीय डॉक्टरांनी जखमीवर औषधोपचार केले . चांदवड पोलीस स्टेशनला गौरव पाटील रा.चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरुहोते तर अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Eight injured in strange accident in road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात