चर खोदून पाणीपुरवठ्याचा भगीरथ प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:57 AM2019-06-22T00:57:03+5:302019-06-22T00:57:26+5:30

गंगापूर धरणासाठी साठ्याचे काम करणाऱ्या दोन धरणांत पाणी असूनही केवळ वीस वर्षांपासून निम्नपातळीवरील पाणी एका खडकामुळे जलविहिरीत येऊ शकत नाही. महापालिकेच्या या बेपर्वाईवर लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून, धरणात शुक्रवारपासून (दि.२१) चर खोदण्याचे काम सुरू झाले आहे.

 Efforts to save water | चर खोदून पाणीपुरवठ्याचा भगीरथ प्रयत्न

चर खोदून पाणीपुरवठ्याचा भगीरथ प्रयत्न

Next

नाशिक : गंगापूर धरणासाठी साठ्याचे काम करणाऱ्या दोन धरणांत पाणी असूनही केवळ वीस वर्षांपासून निम्नपातळीवरील पाणी एका खडकामुळे जलविहिरीत येऊ शकत नाही. महापालिकेच्या या बेपर्वाईवर लोकमतने वृत्त दिल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून, धरणात शुक्रवारपासून (दि.२१) चर खोदण्याचे काम सुरू झाले आहे. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा हा प्रकार असला तरी आता पाणी पावसाने ओढ दिल्याने आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास शहरात पाणी कपात अटळ असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहे. 
दरम्यान, महापौरांसह महापालिकेचे पदाधिकारी शनिवारी (दि.२२) धरणाची पाहणी करणार आहेत.  गंगापूर धरणातून महापालिकेसाठी आरक्षित पाणी मिळत असले तरी त्यानंतर त्यात गौतमी, गोदावरी आणि कश्यपी धरणाचे पाणी सोडते. यंदा हे पाणी अखेरच्या चरणात अर्धवट स्थितीत सोडून जलसंपदा विभागाने अडचण केली आहे. गंगापूर धरणातील साठ्या व्यतिरिक्तकश्यपी या साठवण धरणात सध्या ९० दशलक्षघनफूट, तर गौतमी गोदावरी धरणात ६० दशलक्षघनफूट पाणी आहे. धरणातून हे पाणी सोडले तरी पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून ते मध्ये येत असून, बाष्पीभवनामुळे हे पाणी कमी होईल. याशिवाय ते आल्यानंतर त्याची पातळी कमी असेल तर याच ठिकाणी असलेल्या खडकामुळे ते पाणी धरणाच्या जलविहिरीत पोहोचणार नाही, अशी भीती आहे. गेल्या वीस वर्षांपूर्वी गंगापूर धरणाच्या शिरोभागाच्या कामाच्या वेळीच हा खडक हटवून धरणातील निन्म पातळीवरील पाणी जलवाहिरीत आणण्याचे काम करणे बंधनकारक होते मात्र अद्याप हे काम झालेले नाही. जलसंपदा विभागानेदेखील पालिकेला वेळोवेळी पत्र व्यवहार केला आहे.
आता शहरात पाणीबाणी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: पावसाने ओढ दिल्याने पाणी कितपत पुरेल याविषयी शंका आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले चर खोदण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे.
तर पाणी कपात अटळ
गंगापूर धरणात चर खोदण्याचे काम सुरू असले तरी मूळ खडक हटविण्याचे काम न झाल्याने दीडशे एमसीएफटी पाणी मिळणे अडचणीचे झाले आहे, तर दुसरीकडे चेहेडी बंधाºयाच्या जवळ मलयुक्त आणि अळ्या असलेले पाणी असल्याने पाणी उपसा बंद करण्यात आल्याने दारणा धरणात सुमारे दीडशे दशलक्षघनफूट पाणी आरक्षित असूनही त्याचा उपयोग होत नाही. त्यातच पावसाने ओढ दिली असल्याने आणखी पाच-दिवस पाऊस न झाल्यास पाणी कपात अटळ असल्याची माहिती आयुक्त गमे यांनी दिली.
दारणातून आवर्तन सोडण्यासाठी गमे यांचे पत्र
दारणा धरणातून महापालिकेला ३०० दशलक्षघनफूट पाणी आरक्षण मिळाले आहे. चेहेडी येथे बंधारा बांधून तेथून महापालिका पाणी घेत असली तरी बंधाºयाच्या वरील बाजूस भगूर नगरपालिका आणि कॅण्टोमेंट बोर्डाचे मलयुक्त पाणी येत असून त्यामुळे महापालिकेला शुद्धीकरणात अडचणी येत असल्याने २२ मेपासून येथून पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. सध्या पाण्याची गरज लक्षात घेता दारणा धरणातून पाणी आवर्तन सोडावे, अशी मागणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. महापालिकेच्या वतीने चेहेडी बंधाºयाच्या पुढील बाजूस जेथून मलयुक्त पाणी येते त्याच्या पलीकडे जाऊन बंधारा बांधणे किंवा पाइपलाइन टाकून पाणी चेहेडी बंधाºयात आणणे असे दोन प्रस्ताव होते. त्यापैकी नवीन बंधारा बांधण्याबाबत महापालिका विचार करीत आहे, असे गमे यांनी सांगितले.

Web Title:  Efforts to save water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.