वातावरणातील आर्द्रतेचा द्राक्षबागेवर दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:08 AM2018-12-11T01:08:33+5:302018-12-11T01:09:20+5:30

नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.

Effects of humidity in the atmosphere | वातावरणातील आर्द्रतेचा द्राक्षबागेवर दुष्परिणाम

वातावरणातील आर्द्रतेचा द्राक्षबागेवर दुष्परिणाम

googlenewsNext

मातोरी : नाशिक तालुक्यातील द्राक्षपिकांवर हवेतील आर्द्रता वाढल्याने भुरी, फळकुज, मिलीबग्ज होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत असून, रात्रीच्या फवारण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.
नाशिकची ओळख द्राक्ष पंढरी म्हणून असली तरी या गोड द्राक्षामागील कडवट कहाणी व मेहनत अत्यंत त्रासदायक आहे. द्राक्षबागेची छाटणीपासून अंत्यत जिव्हाळ्याने शेतकरी मेहनत घेत असतो, तोच माल तयार होऊन बाजारपेठेत कवडीमोल विकावा लागतो. परंतु असे असले तरी भविष्यातील बाजार भावाचा विचार न करता शेतकरी मेहनतीने रात्रीचा दिवस करत संकटांना तोंड देत असतो. यंदा ही द्राक्ष पिकास पोषक हवामान असल्याने पिकाचे प्रमाण बºयापैकी आलेले आहे. परंतु हिवाळा लागताच द्राक्षबागेतील तपमान झपाट्याने खाली येत असल्याने बागेतील तपमान नियंत्रणात ठेवणे शेतकºयापुढे मोठे आव्हान ठरत आहे. रात्रीच्या वेळेस बुरशीचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्याच फवारण्या देण्यावर भर देण्यात येत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने बागेत बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढत आहे. भुरीच्या वाढत्या प्रमाणामुळे बुरशीनाशकाच्या फवारण्यावर मोठा खर्च होत असल्याचे परिसरतील शेतकºयांनी सांगितले, बुरशी पाठोपाठ सनबर्न (फळकुज)चे प्रमाणहा वाढत आहे. त्यासाठी कोणतेही औषध नसल्याने बागेवर थेट सूर्यप्रकाशापासून घड वाचविण्यासाठी बागेवर अच्छादन दिले जात आहे, तर पेपरचे कवर लावून घड वाचविला जात आहे. यासाठी शेतकºयांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे, तर अनेक बागांमध्ये शेकोटी करण्याचा प्रयोगही अमलात आणला जात असल्याचे दिसत आहे, थंडीचे प्रमाण वाढत राहिल्यास त्याचा परिणाम द्राक्ष मनी फुगन्यावर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
द्राक्षबागेवर बुरशीचे प्रमाण वाढत असल्याने रात्रीच्या वेळेस फवारण्या कराव्या लागतात कारण रात्रीच्या वेळी हवेतील आर्द्रता वाढल्याने बुरशीचे घडातील प्रमाण झपाट्याने वाढत असते, तसेच वातावरणातील सकाळी थंड व दुपारी सूर्यकिरणाची तीव्रता यामुळे घडात साठलेले दव मणी कुजण्यास कारणीभूत ठरत आहे .  - शशिकांत पिंगळे, बागायतदार, मुंगसरे
शेतकºयांच्या द्राक्षबागेवर मिलीबर्ग (चिकटा)चे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यासाठी लागणाºया औषधीची मागणी होत आहे, तसेच हवेतील गारवा वाढल्याने पिकावर फवारणीही वाढत आहे, शेतकºयांनी बागेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. तसेच फळ कुजण्याचेही प्रमाण असल्याने बागेवर आच्छादन देण्याशिवाय पर्याय नाही.  - बाळासाहेब पिंगळे, दुकानदार
हिवाळ्यात मिलीबर्ग द्राक्ष वेळेवर झपाट्याने वर सरकत घडात जाऊन चिकट द्रव्य टाकून स्वत:चे संरक्षण करतो. त्यामुळे घड खराब होतो, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी तीन हजार ते चार हजार किमतीच्या प्रती एकरी असलेल्या महागड्या औषधाची आठवड्यातून दोनदा फवारणी करावी लागत आहे.  - सुरेश पिंगळे, बागायतदार, चांदशी

Web Title: Effects of humidity in the atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.