सुनेचा छळ करणा-या सासरच्या लोकांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 06:54 PM2018-09-18T18:54:31+5:302018-09-18T18:55:29+5:30

पाच हजाराचा दंड : सहा महिन्यांचा कारावास

Education for people who are ill, | सुनेचा छळ करणा-या सासरच्या लोकांना शिक्षा

सुनेचा छळ करणा-या सासरच्या लोकांना शिक्षा

Next
ठळक मुद्देसहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. महाले यांनी तपास केला आणि दोषारोपपत्र दाखल केले

येवला : गहाण ठेवलेल्या शेतजमिनीचे पैसे देण्यासाठी आणि स्वत:च्या मुलीच्या उपचारासाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी तगादा लावत सुनेचा छळ करणा-या सासरच्या तिघांविरुद्ध येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी सहा महिन्यांची साध्या कारावासाची आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबतची माहिती अशी की, सौ. कविता दिगंबर नागरे (रा. महालखेडा,ता. येवला) यांनी १० एप्रिल २००२ रोजी येवला तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. फिर्यादित म्हटले होते, आई-वडिलांकडून सासरच्या लोकांनी गहाण ठेवलेल्या शेतजमिनीचे पैसे देण्यासाठी आणि फिर्यादिच्या मुलीच्या उपचारासाठी पैसे आणावेत या कारणासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याशिवाय, सूनेला उपाशी ठेवत तिला मारहाणही केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. महाले यांनी तपास केला आणि दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ. अर्चना तामणे यांच्यापुढे चालला असता, सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता डी. आर. जयकर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले गेले. त्यानुसार, न्यायालयाने सासरकडील सिताबाई पुंजा नागरे (रा. महालखेडा), सुरेश रामभाऊ उदावंत आणि शकुंतला सुरेश उदावंत (रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव) यांना दोषी ठरवत सहा महिन्यांची साध्या कारवासाची आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: Education for people who are ill,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.