देवळा तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 07:44 PM2019-07-01T19:44:34+5:302019-07-01T19:46:32+5:30

लोहोणेर : देवळा तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गिरणा नदीपात्र कोरडेठाक पडले असून पाण्याअभावी लोहोणेर परिसरातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. मात्र गिरणा नदीपात्र उघडे पडल्याने मात्र येथील वाळू उपसा धंदा मात्र बीनबोभाट सर्रास ‘मोठ्या’ मेहरबानीने चालू आहे.

Due to non-availability of rain in Deola taluka, due to drought situation | देवळा तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळी परिस्थिती

बेसुमार वाळू उपशामुळे गिरणा नदीपात्र विद्रुप झाले

googlenewsNext
ठळक मुद्दे वाळू उपसा धंदा मात्र बीनबोभाट सर्रास ‘मोठ्या’ मेहरबानीने चालू

लोहोणेर : देवळा तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गिरणा नदीपात्र कोरडेठाक पडले असून पाण्याअभावी लोहोणेर परिसरातील पेरण्याही खोळंबल्या आहेत. मात्र गिरणा नदीपात्र उघडे पडल्याने मात्र येथील वाळू उपसा धंदा मात्र बीनबोभाट सर्रास ‘मोठ्या’ मेहरबानीने चालू आहे.
दिवसा व रात्री होणाऱ्या या बेसुमार वाळू उपशामुळे गिरणा नदीपात्र विद्रुप झाले असून नदीपात्राची सर्वत्र चाळण झाली आहे. जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.
दिवसा रात्री बैलगाडीने वाळू उपसा करावयाचा व रात्री अंधारात ट्रॅक्टर भरून तो विकायचा असा धंदा सध्या या वाळू तस्करांनी सुरू केला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, या दिवसात कुठलाही वाळूचा लिलाव होत नसतो तरीही मोठ्या प्रमाणावर सुरू असताना संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष्य करीत असल्याने ग्रामस्थ चर्चा करीत आहेत.
वाळूच्या धंद्यातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने तरु णपिढी या धंद्याकडे अधिक ओढली जात आहे. रात्रीतून सगळीच ठेप ठेवली जात असल्याने मजूर वर्गाच्या व ट्रॅक्टरच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे.
या बेसुमार वाळू उपसामुळे गिरणा नदी काठावरील सर्वच पाणी पुरवठा योजना कोरडया ठाक पडल्या आहेत विहिरींनी तळ गाठले आहेत.
 

Web Title: Due to non-availability of rain in Deola taluka, due to drought situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.