स्थानिकांचा राजकारण्यांवर भरोसा नाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:18 AM2018-04-25T00:18:24+5:302018-04-25T00:18:24+5:30

महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरात राज्याला जाऊ न देता ते महाराष्ट्राकडे वळविण्यासाठी केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत पेठ तालुक्यात उगम पावणाऱ्या दमणगंगा नदीवर एकदरा परिसरात धरण बांधून ते पाणी गंगापूर धरणाकडे वळविण्याच्या वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या हालचाली पाहता ज्यांच्या बांधावर हा प्रकल्प उभा राहणार आहे ते आदिवासी शेतकरी मात्र अजूनही अनभिज्ञ आहेत.

Do not trust local politicians ... | स्थानिकांचा राजकारण्यांवर भरोसा नाय...

स्थानिकांचा राजकारण्यांवर भरोसा नाय...

Next

पेठ : महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरात राज्याला जाऊ न देता ते महाराष्ट्राकडे वळविण्यासाठी केंद्र शासनाच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत पेठ तालुक्यात उगम पावणाऱ्या दमणगंगा नदीवर एकदरा परिसरात धरण बांधून ते पाणी गंगापूर धरणाकडे वळविण्याच्या वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या हालचाली पाहता ज्यांच्या बांधावर हा प्रकल्प उभा राहणार आहे ते आदिवासी शेतकरी मात्र अजूनही अनभिज्ञ आहेत. तर यावर सोशल मीडियातून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. सोमवारी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी भाजपाचे जिल्हास्तरीय सदस्य डॉ. प्रशांत भदाणे यांनी एकदरे, हनुमंतपाडा, उस्थळे, हेदपाडा, भोयेपाडा, देवगाव या परिसरातील शेतकरी व नागरिकांना एकत्र करून एकदरे दमणगंगा धरण संघर्ष समितीची स्थापना केली. या समितीच्या वतीने तहसील कार्यालयात संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन या प्रकल्पाची संपूर्ण प्रक्रिया व शासनाचे धोरण समजून घेतल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही तसेच स्थानिक जनतेच्या पुनर्वसनाचे काय व कसे ? असे अनेक प्रश्न स्थानिकांच्या डोक्यात घर करून बसले आहेत.  संघर्ष समिती स्थापन करताना कोणत्याही राजकीय पक्षाच्या कुबड्या लावून घेऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेतली जात असली तरी स्वत: प्रशांत भदाणे सत्ताधारी भाजपाचे सदस्य आहेत. एवढे असूनही त्यांनी पक्षाला बाजूला ठेवून स्थानिक शेतकºयांना एकत्र करण्याचे धारिष्ट्य दाखवले. यासाठी भदाणे यांना पक्ष व जनता या दोघांच्या कसोटीत पास होण्यासाठी अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. परिसरातील तरुण कार्यकर्त्यांच्या मते हा प्रकल्प म्हणजे स्थानिक जनतेला देशोधडीला लावणारा प्रकल्प  असून, यामध्ये कोणत्याही पक्षाने आपला राजकीय स्वार्थाचा  किंवा पक्ष संघटनेचा विचार न करता या प्रकल्पाला कडाडून विरोध करावा.

Web Title: Do not trust local politicians ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी