वीज ग्राहकांसाठी चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:47 AM2019-06-25T00:47:49+5:302019-06-25T00:48:10+5:30

२० किलोवॉटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या महावितरणच्या सर्व ग्राहकांना एप्रिल २०२० पासून केव्हीएएच बिलिंगप्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे

 Discussion session for electricity consumers | वीज ग्राहकांसाठी चर्चासत्र

वीज ग्राहकांसाठी चर्चासत्र

Next

नाशिकरोड : २० किलोवॉटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या महावितरणच्या सर्व ग्राहकांना एप्रिल २०२० पासून केव्हीएएच बिलिंगप्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. याप्रणालीबाबत सिन्नर, दिंडोरी आणि इगतपुरी परिसरातील संबंधित ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले होते़
सिन्नर पंचवटी हॉटेलमध्ये तसेच दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील मेगाफाइन फार्मा येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते़
इगतपुरी परिसरातील ग्राहकांसाठी गोंदे दुमाला येथील सॅमसोनाइट साउथ एशिया, येथे चर्चासत्रात नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, नाशिक ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे यांनी मार्गदर्शन केले़ या चर्चासत्राला संबंधित ग्राहकांनी उपस्थित राहून नवीन बिलिंगप्रणालीची माहिती जाणून घेतली़
२० किलोवॉटपेक्षा अधिक विद्युतभार असलेल्या उच्चदाब व लघुदाब ग्राहकांना सध्या केडब्ल्यूएचप्रणालीद्वारे बिलिंग केले जाते. मात्र एप्रिल २०२० पासून यात बदल होणार असून, केव्हीएएच बिलिंगप्रणाली लागू होणार आहे. त्यानुसार आवश्यक असणारे बदल, याप्रणालीचे फायदे, मिळणारा लाभ, प्रणालीबाबत ग्राहकांना असणाऱ्या शंका यासंदर्भात चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले़

Web Title:  Discussion session for electricity consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.