चिप एटीएम कार्डामुळे वाढल्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:47 AM2019-01-14T01:47:04+5:302019-01-14T01:47:04+5:30

सुरक्षिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने मॅग्नेटिक एटीएम कार्ड बंद करून आता चिपवाले एटीएम कार्ड सुरू करण्यात आले आहेत. हजारो ग्राहकांना बॅँकांच्या माध्यमातून अशाप्रकारचे नवे चिपवाले कार्ड वितरित करण्यात आलेले आहे. मात्र बाजारात स्वॅप मशीनवर हे कार्ड प्रतिसाद देत नसल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नव्या कार्डामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेपेक्षा कार्डाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Difficulty growing due to the chip ATM card | चिप एटीएम कार्डामुळे वाढल्या अडचणी

चिप एटीएम कार्डामुळे वाढल्या अडचणी

Next
ठळक मुद्देकार्ड स्वॅप होईना : कार्ड असूनही ग्राहकांचा खोळंबा

नाशिक : सुरक्षिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने मॅग्नेटिक एटीएम कार्ड बंद करून आता चिपवाले एटीएम कार्ड सुरू करण्यात आले आहेत. हजारो ग्राहकांना बॅँकांच्या माध्यमातून अशाप्रकारचे नवे चिपवाले कार्ड वितरित करण्यात आलेले आहे. मात्र बाजारात स्वॅप मशीनवर हे कार्ड प्रतिसाद देत नसल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नव्या कार्डामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेपेक्षा कार्डाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जुन्या एटीएम कार्डातील रकमेच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाल्याने रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने ग्राहकांना चीपवाले एटीएम कार्ड पुरविले जात आहे. मात्र या कार्डामुळे सोय होण्याऐवजी गैरसोयच अधिक झाली आहे. बाजारातील स्वॅप मशाीनमध्ये नव्या कार्डाला अडचणी येत आहेत. सातत्याने स्वॅपचा प्रयत्न करूनही कार्ड वापरात येत नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय वाढली आहे.
शासनाच्या आदेशानुसार ग्राहकांनी बॅँकेत जाऊन आपल्या नावाचे नवीन चिपवाले कार्ड आणले आहेत. परंतु या चीपच्या कार्डमुळे ग्राहकांना पैसे उपलब्ध करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.
शहरातील तसेच महामार्गावरील अनेक पेट्रोलपंपचालकाकडे कार्ड स्वॅप केल्यानंतरही पैसे खात्यातू कट होत नसल्याचे वादाचे प्रसंगदेखील निर्माण झाले आहेत. हॉटेल्समध्येदेखील चीपवाले कार्ड स्वॅप होत नसल्याचे चित्र आहे. नवे कार्ड बाजारात आल्यापासून कार्ड स्वॅप करण्याच्या अडचणी वाढल्या असल्याचे सांगितले जाते.
नवे कार्डही प्रतिसाद देत नाही
जुने कार्ड बंद झालेले असून, नवे कार्डही अपेक्षित प्रतिसाद देत नसल्यामुळे ग्राहकांना मोठी अडचण सहन करावी लागत आहे. नव्या कार्डातून पैसे निघण्यास विलंब तरी होती किंवा पैसे काढतांना ‘ऐरर’ दाखवित असल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्राहकांना नवे कोरे एटीएम कार्ड देण्यात आले मात्र कार्ड वापरताना नाहक मनस्ताप होत आहे. काही ठिकाणी आठ ते दहा वेळा प्रयत्न केल्यानंतर कार्ड स्वीकारले जाते. केवळ स्वॅप मशीनवरच नव्हे तर अनेक एटीएमवरदेखील ग्राहकांना अशाच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

Web Title: Difficulty growing due to the chip ATM card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.