वाढत्या उन्हामुळे गोदाकाठ पडला ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:52 PM2018-02-21T13:52:08+5:302018-02-21T13:59:29+5:30

धार्मिक पुुण्यनगरी म्हणून ओळख असलेला नाशिकचा रामकुंड, पंचवटीचा परिसर वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ओस पडत आहे. परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.

Dew drops due to rising sunlight | वाढत्या उन्हामुळे गोदाकाठ पडला ओस

वाढत्या उन्हामुळे गोदाकाठ पडला ओस

Next
ठळक मुद्दे गोदाकाठाचा रामकुंड परिसरही ओस उन्हाचा चटका शहरात जाणवू लागला संध्याकाळच्या सुमारास काही प्रमाणात रामकुंडाच्या परिसरात गजबज पहावयास मिळते.

नाशिक : येथील गोदावरीचा रामकुंड परिसर नेहमीच भाविक पर्यटकांनी गजबजलेला पहावयास मिळतो; मात्र मागील तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तपमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाचा चटका शहरात जाणवू लागला आहे. यामुळे गोदाकाठाचा रामकुंड परिसरही ओस पडू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
भारताची दक्षिणवाहिनी गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरीनदीला धार्मिकदृष्टया विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक कार्य, विधीसाठी भाविक देशभरातून या ठिकाणी हजेरी लावतात. रामकुं ड परिसराला धार्मिक-पौराणिकदृष्टया महत्त्व प्राप्त आहे. यामुळे भाविकांची सतत या भागात वर्दळ पहावयास मिळते.

गोदाकाठावर विविध प्राचीन व पौराणिक मंदिरे आहेत. नंदी नसलेले महादेव शंकराचे एकमेव शिवलींग असलेले प्राचीन कपालेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, बाणेश्वर मंदिर, देवमामलेदार मंदीर, काळाराम मंदिरासह पंचवटी, सीतागुंफाचा परिसर रामकुंडापासून जवळच असल्यामुळे भाविका येथे आवर्जून हजेरी लावतात. मंदिरांंचे स्थापत्य बघण्यासारखे आहे. धार्मिक पुुण्यनगरी म्हणून ओळख असलेला नाशिकचा रामकुंड, पंचवटीचा परिसर वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ओस पडत आहे. परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे. तसेच बारावीच्या परीक्षांसह प्राथमिक वर्गांच्याही परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे भाविकांची संख्या कमी झाली आहे. संध्याकाळच्या सुमारास काही प्रमाणात नाशिककर रामकुंडाच्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यावेळी गजबज पहावयास मिळते.

Web Title: Dew drops due to rising sunlight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.