आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:10 AM2019-01-21T01:10:23+5:302019-01-21T01:11:58+5:30

महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली दरवाढ रद्द करावी, तसेच अन्य मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

 Demands from Aam Aadmi Party | आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने

आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने

googlenewsNext

नाशिक : महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली दरवाढ रद्द करावी, तसेच अन्य मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.  महापालिकेच्या वतीने घरपट्टीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाढीव घरपट्टीच्या नोटिसा नागरिकांना दिल्या जात आहेत. त्याबाबत महापालिकेने नक्की काय निर्णय घेतला आहे, हे स्पष्ट होत नसून नोटिसा तातडीने थांबवाव्यात तसेच महापालिकेच्या रुग्णालयात सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, बेघरांसाठी बंद निवारा केंद्रे सुरू करावीत, रिक्षा थांबे वाढावेत, शाळांमध्ये सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, यांसह विविध प्रकारच्या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. यात अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, अनिल कौशिक, रमेश मराठे, भालचंद्र राजपूत, विलास मोरे, विक्रम पाटील, अल्ताफ शेख, अभिजित चव्हाण यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title:  Demands from Aam Aadmi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक