वीज वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:31 PM2018-12-30T23:31:09+5:302018-12-31T00:43:10+5:30

भगूर-विजयनगर नागरी भागाला जोडणाऱ्या वेताळबाबा परिसरात विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी होत असून, अनेक ठिकाणी विद्युत वाहिनीचे पोल धोकादायक परिस्थितीत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नागरिक वर्तवित आहे.

 Demand for underground electricity channels | वीज वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी

वीज वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी

Next

देवळाली कॅम्प : भगूर-विजयनगर नागरी भागाला जोडणाऱ्या वेताळबाबा परिसरात विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी होत असून, अनेक ठिकाणी विद्युत वाहिनीचे पोल धोकादायक परिस्थितीत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नागरिक वर्तवित आहे.
भगूर नगरपालिका व छावणी परिषद यांची नागरी हद्दीला जोडणारा वेताळबाबारोड परिसरात विद्युत वाहिन्या धोकादायक परिस्थितीत असून महावितरणकडे मागणी करूनही अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. वेताळबाबा रोडवरील विद्युत वाहिन्या खूप जुन्या झाल्याने ठराविक उंचीपेक्षा झोळ पडल्याने बांधकाम असलेल्या घरांकरिता धोकादायक ठरू पाहात आहेत. बांधकाम व्यावसायिकांना महावितरणचे अधिकारी तातडीने दुरुस्ती करून काही विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या पण त्रासदायक ठरणाºया धोकादायक काम करण्यास महावितरणकडे वेळ आणि निधीची कमतरता असल्याचे अधिकारी वर्ग सांगतात.
एखाद्या वेळेस अपघात  होऊन अप्रिय घटना घडल्यास महावितरणला जबाबदार धरून शिवसेना स्टाईल समज देणार असल्याचे श्याम ढगे यांनी सांगितले. त्यामुळे वीज वाहिन्या तातडीने भूमिगत करण्यात याव्यात, असेही ते म्हणाले.

Web Title:  Demand for underground electricity channels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.