वाढीव पाणी आरक्षणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:25 AM2017-08-31T00:25:48+5:302017-08-31T00:25:56+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातून महापालिकेने यंदा ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविली आहे. मागील वर्षी महापालिकेने गंगापूरमधून ४२०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली असता ३९०० दलघफू आरक्षणाला मान्यता दिली होती. त्यामुळे महापालिकेला आरक्षित पाण्याचा काठोकाठ वापर करावा लागला होता. यंदा पालिकेने धरणातून वाढीव ४०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली आहे.

Demand for increased water reservation | वाढीव पाणी आरक्षणाची मागणी

वाढीव पाणी आरक्षणाची मागणी

Next

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातून महापालिकेने यंदा ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविली आहे. मागील वर्षी महापालिकेने गंगापूरमधून ४२०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली असता ३९०० दलघफू आरक्षणाला मान्यता दिली होती. त्यामुळे महापालिकेला आरक्षित पाण्याचा काठोकाठ वापर करावा लागला होता. यंदा पालिकेने धरणातून वाढीव ४०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली आहे. महापालिकेने गेल्या वर्षी दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी गंगापूरमधून ४२०० दलघफू तर दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली होती परंतु, जलसंपदा खात्याने गंगापूरमधून ३९०० तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाला मान्यता दिली होती. महापालिकेने २९० दिवसांत पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करत प्रतिदिन १४.७३ दलघफू पाणी उचल लक्षात घेता ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील पाण्याचा पूर्णपणे वापर केला होता. यापुढे पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता महापालिकेने १५ आॅक्टोबर २०१७ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीसाठी गंगापूर धरणाच्या पाणी आरक्षणासंदर्भात जलसंपदा विभागाकडे वाढीव पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली आहे. यंदा गंगापूर धरणातून ४३०० दलघफू तर दारणातून ३०० दलघफू याप्रमाणे एकूण ४६०० दलघफू पाण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१५ मध्ये गंगापूर धरणातील पाणी मराठवाड्याला सोडण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. त्यावेळी पाणी आरक्षण निश्चित करण्यावरूनही महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी विरुद्ध शासन असा सामनाही रंगला होता. सन २०१६ मध्ये समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने आवर्तनावरून वादाचा प्रसंग आला नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे गंगापूर आणि दारणा धरण मिळून ४६०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली होती. यंदाही महापालिकेने त्याच मागणीवर ठाम राहत नोंदणी केली आहे. यंदा गंगापूर धरणात ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गंगापूरमधून वाढीव पाणी आरक्षणाच्या मागणीबाबत जलसंपदा खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दारणातील पाणी आरक्षणाचा प्रश्न
महापालिकेसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित केले जात असले तरी आजवर केवळ ३०० दलघफूच्या आसपासच पाणी उचल करू शकले आहे. ज्यावेळी चेहेडी बंधाºयाला आवर्तन असते त्याचवेळी पाणी उचल करता येते. त्यामुळे दारणातील पाणी आरक्षणाचा फारसा उपयोग महापालिकेला होत नाही. त्यासाठीच महापालिकेने दारणातील आरक्षण कमी करून ते गंगापूर धरणात वाढवून देण्याची मागणी सातत्याने लावून धरलेली आहे. यंदाही महापालिकेला आरक्षित ४०० दलघफू पाण्यापैकी २७४.३२ दलघफू पाणीच उचलता आले आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा ३०० दलघफू पाण्याचीच मागणी केली आहे.

Web Title: Demand for increased water reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.