खाद्यपदार्थ पोहचविणारे ‘डिलिव्हरी बॉय’ धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:03 AM2018-10-24T01:03:36+5:302018-10-24T01:04:09+5:30

मुंबई, पुणे शहराच्या बरोबरीने विकासाच्या वाटेवर गतिमान असलेल्या नाशिक शहरातही काही आॅनलाइन कंपन्यांनी घरपोहच पसंतीच्या हॉटेलमधून खाद्यपदार्थ पोहचविण्याची सेवा सुरू केली आहे; मात्र या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले गरजू ‘डिलिव्हरी बॉय’ धोक्यात सापडले आहे.

 Delivery Delivery 'delivery boy' threat | खाद्यपदार्थ पोहचविणारे ‘डिलिव्हरी बॉय’ धोक्यात

खाद्यपदार्थ पोहचविणारे ‘डिलिव्हरी बॉय’ धोक्यात

Next

नाशिक : मुंबई, पुणे शहराच्या बरोबरीने विकासाच्या वाटेवर गतिमान असलेल्या नाशिक शहरातही काही आॅनलाइन कंपन्यांनी घरपोहच पसंतीच्या हॉटेलमधून खाद्यपदार्थ पोहचविण्याची सेवा सुरू केली आहे; मात्र या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले गरजू ‘डिलिव्हरी बॉय’ धोक्यात सापडले आहे. शहरातील झोपडपट्टी भागात कंपन्यांच्या या कर्मचाऱ्यांना मारहाण तर काही भागात लूटीच्या घटना घडल्याने शेकडो ‘डिलिव्हरी बॉय’मध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.  स्मार्ट शहरांच्या यादीत समाविष्ट असलेल्या नाशिक शहरातही एक दोन नव्हे तर तीन कंपन्यांनी आॅनलाइन खाद्यपदार्थ घरपोहच पोहचविण्याची सेवा सुरू केली. मागील दोन महिन्यांमध्ये या कं पन्यांनी शहरात पाय रोवले असून, यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताला रोजगारही मिळण्यास मदत झाली. तिन्ही कंपन्यांचे मिळून ‘डिलिव्हरी बॉय’ची संख्या हजारोंच्या घरात पोहचली आहे. बेरोजगार नाशिककर युवकांना रोजगार मिळाला असला तरी काही झोपडपट्ट्यांच्या परिसरात अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांना त्रास दिला जात आहे. मागील काही दिवसांमध्ये पंचवटीमधील रामवाडी, क्रांतीनगर, जुन्या नाशकातील कथडा, राजीवनगर, लेखानगर झोपडपट्टी, वडाळागाव झोपडपट्टी, गणेशवाडी या भागांमध्ये आॅनलाइन खाद्यपदार्थ संबंधित पोहचविणाºयांना त्या ग्राहकांनी वाद घालून मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  यासंदर्भात पोलिसांनी तत्काळ पावले उचलावीत व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी डिलिव्हरी  क रणारे हेमंत इंपाक, नीलेश खाडे, साहेबराव थोरात यांनी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी (दि. २३) केली आहे. अनोळखी इसमांनी त्यांना मारहाण केल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच अन्य प्रतिनिधींनाही अशाप्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाशिकरोड भागात डिलिव्हरी देण्यासाठी आलो असता संबंधितांनी मागविलेले खाद्यपदार्थ घेण्यास नकार दिला. आॅर्डर रद्द करण्यासाठी दबाब वाढविला. त्यानंतर संबंधितांनी वडनेर गावात जाण्याचा आग्रह धरला; मात्र रात्रीचे बारा वाजत असल्याने मी कंपनीच्या ग्राहक सेवा अधिका-याकडे जाण्यास असमर्थता दर्शविली. अधिका-याने सदर आॅर्डर रद्द केली त्यामुळे मी वाचलो अन्यथा त्या मुलांनी मारहाण केली असती.  - नीलेश खाडे, डिलिव्हरी बॉय
गुन्हेगारीच्या प्रवृत्तीच्या फुकटखाऊंचा उपद्रव
बेरोजगारी वाढत असताना, हाताला रोजगार मिळण्याची संधी आलेली असताना काही फुकटखाऊ व्यक्तींकडून ‘डिलिव्हरी बॉय’ यांना मारहाण केली जात असल्याने शहराच्या प्रतिमेलाही डाग लागत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास जे टवाळखोर विविध कट्ट्यांवर बसलेले असतात त्यांच्याकडून त्रास दिला जात आहे. रात्री व भरदिवसाही अशाप्रकारे घटना घडत आहेत.
सुरक्षा वाºयावर; कंपनीने लक्ष देण्याची गरज
मुंबई, पुण्यात कार्यरत असलेल्या नामांकित कंपन्यांनी नाशिकमध्येही सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या कं पन्यांमध्ये हजारो युवक ‘डिलिव्हरी बॉय’ म्हणून कार्यरत आहेत. याचा थेट फायदा कंपनीसह शहरातील व्यावसायिकांना होत असला तरी दुचाकीवरून दिवसभर भटकंती करत कंपनीचा नावलौकिक वाढविणाºयांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याबाबत कंपनींच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तत्काळ लक्ष घालून सुरक्षेसंबंधी उपाययोजना करण्याची मागणी हजारो ‘डिलिव्हरी बॉय’ यांनी केली आहे.

Web Title:  Delivery Delivery 'delivery boy' threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.